Home पुणे करोना वर मात करून घरी आला मात्र बाईने घात केला ,???

करोना वर मात करून घरी आला मात्र बाईने घात केला ,???

1126
0

 

 

 

अमीन शाह ,

करोनाच्या रुपाने काळ आला होता. पण, करोनावर मात करून त्याने मृत्यूला हुलकावणी दिली. करोनातून बरा झाला, पण पत्नीनेच त्याचे प्राण घेतले. अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणार्‍या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा दाबून हत्या केली. पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मनोहर हांडे असं मयत व्यक्तीचं नाव असून, अश्विनी मनोहर हांडे (पत्नी) आणि गौरव मंगेश सुतार (पत्नीचा प्रियकर) अशी आरोपींची नावं आहेत. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची येथे मयत मनोहर नामदेव हांडे हा पत्नी अश्विनी याचं कुटुंब होतं. मनोहर याला मागील महिन्यात करोना आजार झाला. तो घरीच करोनावर उपचार घेत होता. त्यातून तो बरा देखील झाला होता. मात्र त्याच दरम्यान २४ मे रोजी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तो करोना आजाराने मृत्यू झाल्याचे त्याच्या पत्नीने कुटुंबियांना सांगितलं. मात्र, हे असत्य फार काळ लपून राहिलं नाही. पोलिसांना त्यांच्या खबऱ्याने मनोहरची हत्या करण्यात आल्याची माहिती दिली. मयत मनोहर याची पत्नी अश्विनी हिचे गौरव या तरुणासोबत अनैतिक संबध होते. त्यातूनच मनोहर याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर, मनोहर याची पत्नी आणि अश्विनी या दोघांनी खून केल्याची कबुली त्याने दिली.

Previous articleशिवराज्याभिषेक दिनाचा अवचित्य साधत पालकमंत्री सुनील केदार ने 11 रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले
Next articleकिनवट पंचायत समिती कार्यालयात उभारली शिवशक राजदंड स्वराज्यगुढी
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.