Home महाराष्ट्र अशी सून बाई नको ग बाई ,???

अशी सून बाई नको ग बाई ,???

242
0

 

सुनेने मुलाच्या मदतीने सासूला मारून टाकले ,

अमीन शाह ,

लातूर : वृद्ध सासूचा सांभाळ करताना वैतागलेल्या सुनेने आपल्या मुलाच्या मदतीने सासूची हत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या उमरगा-हाडगा या गावात घडली आहे. सासू आणि सुनेच्या नेहमी होणाऱ्या भांडणातून सासूची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.
सासू-सुनेमध्ये वाद

निलंगा तालुक्यातल्या हाडगा-उमरगा इथं शिवाजी माने हे आपल्या आई ,पत्नी आणि मुलासह राहत होते. त्यांची आई आणि पत्नीमध्ये नेहमी भांडणे व्हायची, मात्र त्याकडे शिवाजी दुर्लक्ष करुन आपल्या नोकरीवर जायचे. आपल्या वृद्ध आईकडेच पैसे का देता? आम्हाला का देत नाहीत, वृद्ध आईवर का खर्च करता, अशा कारणांवरुन घरात भांडणे व्हायची. याच भांडणातून वृद्ध सासू रुक्मिणीबाई माने यांची गळा आवळून हत्या करण्यात आली.
मुलाची पत्नीविरोधात तक्रार
मृत अवस्थेतच रुक्मिणीबाई यांना निलंगा येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याचा अहवाल दिला. या प्रकरणी मयत रुक्मिणीबाई यांचा मुलगा शिवाजी माने यांच्या फिर्यादीवरून शिवाजीची पत्नी ललिता माने (वय 55) आणि मुलगा गणेश माने (वय 24) यांच्याविरोधात पोलिसात गुन्ह्याची नोंद करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सासू-सुनेच्या भांडणात घरकर्त्या शिवाजीला अनेकदा मनस्ताप व्हायचा, घटना घडली त्या दिवशी शिवाजीच्या आईनेच त्याला डबा करून दिला होता, तो अखेरचा ठरला. या घटनेने उमरगा-हाडगा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Unlimited Reseller Hosting