Home मराठवाडा तीर्थपुरी झाली नगरपंचायत

तीर्थपुरी झाली नगरपंचायत

1500

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावाचा संपूर्ण कायापालट करून गावास नगरपंचायतचा दर्जा मिळावा यासाठी तीर्थपुरी गावचे कर्तव्यदक्ष सरपंच शैलेंद्र पवार आणि गावच्या विकासाचे मुख्य सुत्रधार महेंद्रभाऊ पवार यांच्या ध्येयधोरणाचे खरोखरच कौतुक करावे लागणार आहे.पवार बंधूंची जिद्द ,परिश्रम आणि आत्मविश्वास यामुळेच तीर्थपुरी गावाला नगरपंचायतचा दर्जा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना चे पालकमंत्री तथा घनसावंगी मतदार संघाचे आमदार राजेश टोपे
यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार व सरपंच शैलेंद्र पवार यांनी तीर्थपुरी शहराचे विकासाचे ध्येय स्वप्न समोर ठेवून गेली सहा महिन्यापासून तीर्थपुरी ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये करण्यासाठी तीर्थपुरी पासून तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय , महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग वित्त व नियोजन विभाग, या कार्यालयामार्फत अहोरात्र प्रयत्नाची पराकाष्टा करून अखेर मराठवाड्यातील एकमेव तीर्थपुरी ला नगरपंचायत चा दर्जा मिळवून दिला असून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी ही घोषणा केल्याचे पत्र आज जाहीर केले आहे.तीर्थपुरी गावाला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्याची घोषणा होताच येथील पश्चिम हनुमान मंदिरासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले यावेळी शैलेंद्र पवार, शिवाजी बोबडे यांचे सह ग्रामस्थांनी आनंद घेतला.