Home महाराष्ट्र अभिनेत्री जुही चावला ला कोर्टाने ठोठावला 20 लाख रुपये दंड ,

अभिनेत्री जुही चावला ला कोर्टाने ठोठावला 20 लाख रुपये दंड ,

1113
0

 

 

5 जी विरोधात दाखल केली होती याचिका ,

अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली 5G सेवेला विरोध दर्शवणारी याचिका न्यायालयानं आता रद्द केली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्त्यांना २० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्याचबरोबर जुहीने ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली असल्याचंही उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

5G नेटवर्कच्या तरंगांमुळे पर्यावरण आणि मानवी आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करावा, त्यासंदर्भात संशोधन करण्यात यावं अशी जुहीची याचिका होती. आज झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सांगितलं की ही याचिका केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने सांगितलं की या याचिकेला कोणताही आधार नाही, ही याचिका विनाकारण दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने सांगितलं की तिने सर्वप्रथम सरकारकडे याबद्दल आपलं म्हणणं मांडायला हवं होतं. त्याचप्रमाणे जुहीने या याचिकेच्या सुनावणीची लिंक सोशल मीडियावर व्हायरल केली असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.

Unlimited Reseller Hosting
Previous articleकायदे का रक्षक बना भक्षक , ????
Next articleतीर्थपुरी झाली नगरपंचायत
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.