Home महत्वाची बातमी कायदे का रक्षक बना भक्षक , ????

कायदे का रक्षक बना भक्षक , ????

1737

 

 

 

 

ठाणेदाराने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर केला बलात्कार ,

 

तक्रार दाखल

पोलीस दलात उडाली खळबळ ,

अमीन शाह

स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर बलात्कार करून मारहाण केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे . आरोपी विश्वकांत गुट्टे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक असून , त्यांच्यावर 376 सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून , पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत . दरम्यान पोलीस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात 2007 मध्ये विश्वकांत गुट्टे पीएसआय या पदावर कार्यरत असतांना सदर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख झाली होती.त्याच ओळखीचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी वाशिममध्ये आरोपी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा घरी आला व त्यांने जबरदस्ती करीत बलात्कार केला आहे.त्याप्रकरणी काल रात्री महिला पोलीस कर्मचारी यांनी वाशिम शहर पोलिसांत 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून , पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करीत असल्याची माहिती मिळाली असून घडलेल्या घटने मुले पोलीस दलात खळबळ उडाली आहे ,