Home मराठवाडा जालन्यात पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण , सरकार दोषींवर कारवाई करणार का ...

जालन्यात पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण , सरकार दोषींवर कारवाई करणार का , “रक्षक बनले भक्षक”

512
0

रुग्णालयात गोंधळ घातल्याच्या आरोप

जालना प्रतिनिधी

जालना ः जालना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप करत महिनाभरापूर्वी एका रुग्णालयात धुडघूस घालणाऱ्या एका तरूणाला जालना पोलिसांनी लाठ्या तुटे पर्यंत बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या अमानुष मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘साहेब माफ करा’, साहेब माफ करा अशी विनवणी करूनही कदम जालना चे पि आय प्रशांत महाजन आणि त्यांचे सहकारी जवळपास पाच ते सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठ्यानी त्या तरूणाला बेदम झोडपले.

शिवराम नारियलवाले असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे कळते.
शिवराम नारियलवाले यांच्या एका नातेवाईकाच्या अपघात झाला होता. तेव्हा रुग्णालयात त्या नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत काही तरुणांनी रुग्णालयात महिनाभरापूर्वी चांगलाच गोंधळ घातला होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. लाचेच्या प्रकरणात अटक झालेले तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आणि कदिम जालना ठाण्याचे निरीक्षक यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास मज्जाव करत होते. परंतु, पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठ्यांचा तुफान मारा केला. काही तरुण रुग्णालयात धुडघूस घालत असल्यानेच त्यांना अटकाव करण्यासाठी हा लाठीमार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. व्हायरल व्हिडीओत पोलिसांनी अक्षरशः काठ्या तुटेपर्यंत मारहाण केली. डोक्यात देखील काठ्या घातल्या. शेवटी एका डॉक्टरांच्या मागे आश्रय घेत त्या तरुणाने सुटका करून घेतल्याचे दिसत आहे.