Home विदर्भ जसापूर (कोळी) येथे कोविड लसीकरणाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

जसापूर (कोळी) येथे कोविड लसीकरणाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

86
0

धनराज खर्चान

अमरावती – आज दिनांक २७/०५/२०२१ रोज गुरुवारला भातकुली तालुक्यामधील जसापूर (कोळी) येथे कोविड लसीकरणाचा कॅम्प श्री.मंगेश भाऊ थोरात (सरपंच,ग्रामपंचायत, जसापूर) सौ.निर्मलाताई समाधानराव दहातोंडे (उपसरपंच ग्रामपंचायत जसापूर) तसेच ग्राम पंचायत चे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
या वेळी गावातील लोकांनी कोविड लसीकरणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत,लसीकरण करण्याकरिता रांगा लावत,लसीकरण करून घेतले. लसीकरण यशस्वीपणे राबविण्यासाठी डॉ.निकोसे सर (वैद्यकीय अधिकारी खोलापूर),डॉ.रोडे मॅडम (वैद्यकीय अधिकारी), श्री.वाघमारे सर (आरोग्य सहाय्यक),डॉ.शुष्मीना राव मॅडम, श्रीमती सूर्यवंशी मॅडम, (आरोग्य सेविका),श्री.मनकावार सर (आरोग्य सेवक),तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका ह्या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभेल.