Home विदर्भ बीजेपी सरकारातील कर्ज माफी आघाडी सरकारला मान्य नाही?

बीजेपी सरकारातील कर्ज माफी आघाडी सरकारला मान्य नाही?

124
0

आलेगाव ग्रामीण बैंकेचा प्रताप…!

चालु कर्जाची रक्कम जमा केल्यावर शाखा प्रबंधक म्हणतो तुमचा जुना कर्ज माफ झाला नाही

प्रा.मो.शोएबोद्दीन

अकोला / आलेगाव – पातूर तालुक्यातील आलेगाव येथील ग्रामीण बैंकचा अजब कारभार बी जे पी सरकार मध्ये शिवाजी महाराज कर्ज माफी योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे झालेल्या कर्ज माफी अकोला ग्रामीण बैंक शाखा आलेगाव यांना मान्य नसल्याचे चित्र दिसून
येथ आहे आलेगाव येथील काही शेतकर्यांना मागच्या वर्षी बी जे पी सरकार मध्ये कर्ज माफिच्या यादी मध्ये आलेगाव येथील शेतकऱ्यांचे नाव होते आणि आघाडी सरकार मध्ये सावित्रीबाई फुले योजने अंतर्गत सुद्धा नाव यादीत होते मागच्या वर्षी आलेगाव ग्रामीण बैंकेच्या शाखा प्रबंधक यांनी कर्ज माफी झलयावर नवीन कर्जाचे वाटप सुध्दा केले होते।परंतु या वर्षी शेतकऱ्यांनी पैशे उचने पचणे आणून चालु कर्जाची परतफेड केली परंतु जेंव्हा नवीन कर्ज साठी शेतकरी गेल्यावर वर आणि चालू कर्जाची परत फेळ केल्यानंतर आलेगाव शाखेचे शाखा प्रमुख म्हणतात तुमचे मागील कर्ज बाकी आहे ते भरा आणि नवीन कर्ज घ्या।चालु कर्ज भरल्यावर व जुने कर्ज माफ झाल्यावर अजून कोणता कर्ज भरायचा असा शेतकरयांना विचार पडला आहे नैसर्गिक आपदा व लॉक डाऊन मुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्या आवजी आघाळी सरकार शेतकरियांची फसवणूक करत असल्याचे शेतकरियांचे म्हणणे आहे ।नेमका आलेगाव ग्रामीण बैंकचे शाखा प्रमुख कोणाचा हिश्र्यावर काम करत आहे हे कळेनासे झाले

आमच्या जवळ कर्जाची परत फेळ साठी पैशे नसल्याने आम्ही पुनरगाठण केला होता जे, बी जे पी सरकार मध्ये शिवाजी महाराज कर्ज योजने अंतर्गत व उरलेला आघाडी सरकार मध्ये सावित्रीबाई फुले अंतर्गत माफ झाला होता त्यानंतर आम्हाला 2020 मध्ये नवीन कर्जाचे वाटप करण्यात आले होते ज्याची या वर्षी आम्ही परत फेळ केली परंतु जेंव्हा आम्ही नवीन कर्ज मागायला गेलो तेंव्हा आलेगाव ग्रामीण बँक चे शाखा प्रबंधक म्हणतात तुमचा जुना कर्ज माफ झाला नाही ते पशे भरा व नवीन कर्ज उचला चालू खर्चाची परत फेळ आम्ही कर्ज घेऊन केली। की नवीन कर्ज भेटल्यावर आम्ही ते वापस करू परंतु आमच्या समोर हे नवीन प्रश्न उभा झाला म्हणजे मागील कर्ज माफी झाल्या वर सुद्धा त्याची परत फेळ करण्याचा आम्हाला आलेगाव ग्रामीण बैंक चे प्रबंधक सांगत आहे आत्ता नेमका आम्ही करायचं तर काय जर आमचा जुना कर्ज माफ झालं ना होता तर मागील वर्षी आम्हाला नवीन कर्ज का देण्यात आले

शेतकरी – आलेगाव ग्रामीण बँकेचे शाखा प्रबंधक यांना फोन केल्यावर त्यांना आवाज येत ना होती पुन्हा फोन केल्यावर शाखा प्रबंधकांनी आपला फोन बंद करून ठेवला

शाखा प्रबंधक