Home विदर्भ कारंजा येथे प्रहार च्या फिरत्या रक्तदान शिबिराला सुरवात , बाळा जगताप यांच्या...

कारंजा येथे प्रहार च्या फिरत्या रक्तदान शिबिराला सुरवात , बाळा जगताप यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

438

ईकबाल शेख

 वर्धा –  प्रहार जनशक्ती पक्ष कारंजा तालुका द्वारा आयोजित रक्तदानाच्या अभिनव उपक्रम आज दिनांक 25 मे रोजी प्रहारचे शेतकरी नेते बाळाभाऊ जगताप यांच्या हस्ते फिरत्या रक्तदान शिबिराच्या गाडीला हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली.
यावेळी प्रहारचे अरसलान खान, राजुभाऊ तेलखडे, अक्षय भोणे, विक्रम भगत, रोहित घागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत असताना प्रहारच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. कारंजा शहरातून आज या उपक्रमाला सुरवात झाली असून येत्या काही दिवसात प्रत्येक गावात येऊन रक्त संकलनाचे कार्य प्रहार च्या माध्यमातून होणार आहे. या फिरत्या रक्तदान शिबिराचे संयोजक प्रहार चे अक्षय भोणे हे असून त्यांच्या सर्व टीमचे सर्व सहकारी मित्र हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व आर्वी विधानसभा क्षेत्राचे नेते बाळाभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात हा संपूर्ण उपक्रम येत्या काही दिवसापर्यंत संपूर्ण कारंजा तालुक्यात राबवण्याचा मानस आहे. असे यावेळी संयोजक अक्षय भोणे व त्यांच्या सर्व सहकार्यामार्फत सांगण्यात आले. या सर्व उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ऋषिकेश राऊत, साहिल मानमोडे, राजेश घागरे, दिप चाफले, गोलू पाल, मंगेश देशमुख यासह सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.