Home विदर्भ मातोश्री वृद्धाश्रम येथे निर्मिती उपजीविका केअर तर्फे हनी-डे साजरा…

मातोश्री वृद्धाश्रम येथे निर्मिती उपजीविका केअर तर्फे हनी-डे साजरा…

190
0

यवतमाळ –  आज दि.20 मे रोजी यवतमाळ लगत निळोणा येथे हनी-डे निर्मिती उपजीविका केअर तर्फे सोशल डिस्टन्स मध्ये पळाला गेला तसेच वृद्धाश्रमाला पळसाचे 5 वर्षे जुने सहद व खंडूचक्का तेल अर्धा लिटर भेट देण्यात आले…
गेल्या 10 वर्षांपासून निर्मिती उपजीविका केअर दरवर्षी हनी-डे वेग-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत होते जेणे करून सामाजिक बांधिलकी जोपासून सामाजिक हित तसेच जनतेचे स्वास्थकरिता लाभदायक राहील…परंतु,ह्या वेळेस प्रत्येक मनुष्य आपल्याच समस्येत गुंतून आहे ह्याला परिस्थिती जबाबदार आहे…म्हणून,निर्मिती उपजीविका केअर तर्फे मातोश्री वृद्धाश्रम येथे बुजुर्ग लोकांसाठी ह्या कोरोना महामारीपासून संरक्षण व्हावे करिता पळसाचे 5 वर्षे जुने सहद जे अतिशय लाभदायक असतात व सामान्य सहदापेक्षा 10 पटीने गुणकारी असतात तसेच मांस पोषक,अस्थीपोषक असे विभिन्न गुण ह्यात असून चर्चे दरम्यान सहदाचे/हनी चे गुण, प्रकार निर्मिती उपजीविका केअर चे संचालक मा.राजेंद्रकुमार दुधकोर यांनी सांगितले आहे…
●मध(सहद)एक अमृत…
मधमाश्या फुलांपासून मधुर रस शोषून मधाच्या पोवळ्यांमध्ये साठवितात.1 किलो मध तयार करण्यासाठी मधमाश्या यांना 3 ते 5 लाख फुलांवर बसावे लागते…तसे पाहिले असता फुलांचा रस म्हणजे”इक्षु शर्करेचा”प्रकार होय…परंतु,मधाच्या पोळ्यात त्या रस मध्ये रासायनिक फेरफार होत असतात त्यामुळे इक्षु शर्करा हे द्राक्ष शर्करेचे(ड्रॅक्स्ट्रोज) आणि फळ शर्करेचे(ल्युव्युलोज) मध्ये रूपांतर होते…यामुळेच मधात फक्त 1.9% इक्षु शर्करा असते.76.4%ऐकून शर्करेमधून 40.5% ल्युव्हूलोज आणि 34%ड्रॅक्स्ट्रोज प्रमाण असते…शिवाय यामध्ये प्रामुख्याने जीवनसत्व B चे प्रमाण असून लोह,फॉस्फरस, कॅल्शियम, सोडिअम, पोटॅशिअम, सल्फर व म्याग्नेज देखील असते…विशेषतः मधाचा रंग जो-जो बदलतो तो-तो त्याचे क्षारांचे प्रमाण वाढते…मधामध्ये थोड्या प्रमाणात थायमिन-6,रोबोफ्लेविन-60,नियासीन-32 आणि जीवनसत्त्वे C मायक्रोग्रॅम असते…
●मधाचे औषधीचे गुणधर्म:-
मध शीतल,हलके,मधुर,रुक्ष मळास बांधणारे(शौचास साफ होणे),मलावरोध दूर करणारे,नेत्रांस हितकारक,अग्निप्रदीप्त, स्वर सुधारणारा,जखम स्वच्छ करणारा,तुरट,आनंदायि, वर्ण सुधारणारा,बुद्धीची धारणशक्ती वाढविणारे, मैथुनशक्ती वाढविणारे,स्वच्छ व रुचकर,कोड,अर्श,खोकला,पित्त-रक्त दोष-रक्तपित्त, कफ,प्रमेह,ग्लॅनी, कृमी,मेद,तहान,उलटी,श्वास त्रास,अतिसार,दाह,क्षय, हृदयासाठी,पित्ताशय सुधार,जठराग्नी प्रदीप्त,अस्थिभंग साधणारे,वाजीकरण,त्रिदोष,लहान-मोठ्या आतड्याचा दाह,मूत्रपिंड सुधार,नाडी सुधार इ.अनेक गुण आहेत…
●आयुर्वेदाच्या मते मधाचे आठ प्रकार आहेत:-
माक्षिक, भ्रमर, क्षौद्र,पौतिक, छात्र, आर्ध्य, औदालीक, व दाल हे मध साठविणाऱ्या माश्यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे…
सामान्यतः मध दोन प्रकारचे असते:-
1)कृतायु मध,
2)माखीयु मध,
ज्या माश्यांचे पोळ उडविल्यावर माश्या दंश करतात त्यांना”माखीयु मध” व ज्या दंश करीत नाही त्यांना “कृतायु मध”असे संबोधतात…या दोन्ही मधामध्ये चवीला थोडा फरक आढळतो…पण शास्त्रानुसार आयुर्वेद मते उपचारात्मक करिता माखीयु मध व सेवन करण्याकरिता कृतायु मधाचा उपयोग होतो…
●मध काढण्याची विधी व पद्धती:-
तसे पाहिले तर लोक कधिपन सहद काढतात व साठवून ठेवून सेवन करतात परंतु,शरीराला उपयुक्त तेच सहद असते जे ऋतूनुसार व विधिनुसार काढले जातात…नाहीतर नाण्याची दुसरी बाजू कधी धोकादायक ठरेल सांगता येत नाही…कारण, जुन्या लोकांची म्हण आहे-“अपूर्ण ज्ञान हे जीवनाचे सर्वनाशाचे कारक ठरतो”…
★मध हे वर्षातून 2 वेळेस काढले जातात…प्रथम “चैत्र-वैशाख मध्ये”
दुसरे चरण”कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये”….
★विधी:-जंगलातील आदिवासी,मागासलेले लोक,कातकरी इ. लोक मध एकत्रित करतात…मध काढण्याची रीत जुनी असल्यामुळे पोळ्यात असणारी अंडी,मेन चिरडले जातात,त्यामुळे “निर्मिती उपजीविका केअर चे संचालक-राजेंद्रकुमार दुधकोर,महाराष्ट्र राज्य हनी प्रशिक्षक” यांनी एक यांत्रिक पद्धतीने सहद काढण्याची रीत बनविली ज्यांत सहदाचे पोळे टाकून एका विशिष्ट RPM(रोटेशन पर मिनिट)वर फिरून एक विशिष्ट तापमानावर सहद बाहेर निघते व पोळे व अंडी यांना नुकसान होत नाही तसेच पौष्टीक सहद आपल्याला प्राप्त होते…सहदाचे प्रशिक्षण केंद्र यवतमाळ सह महाराष्ट्र, मध्य प्रदेश,छत्तीसगड या राज्यांमध्ये आहे व तब्बल 19000 बचत गट यांना प्रशिक्षण देऊन शेकडो महिला आज अश्या लॉक डाऊन मध्येही आपले कुटुंब चालवीत आहे…सोबत वनौपज म्हणजे-मोहा,तेंदूपत्ता,बांबू,पांढरी मुसळी,काळी मुसळी इ.यांच्यावर विविध प्रकारचे प्रयोग करून “स्वास्थवर्धक-आरोग्यवर्धक” खाद्य पदार्थ यांची निर्मिती “निर्मिती महिला लघु उद्योग संघ”आयुर्वेद विभागाद्वारे करतात… दरम्यान मातोश्री वृद्धाश्रम येथिल सहकारी नितेश अढाव हे होते,मार्गदर्शन मा.प्रवीण बंडेवार साहेब यांचे लाभले…आभार प्रदर्शन डॉ.विवेक चौधरी(निर्मिती उपजीविका केअर-आयुर्वेद विभाग प्रमुख)यांनी केले.