Home विदर्भ कडधान्यांची आयात रद्द करा व खताचे वाढीव भाव तातडीने कमी करा या...

कडधान्यांची आयात रद्द करा व खताचे वाढीव भाव तातडीने कमी करा या मागणीसाठी प्रहारचे एस डी ओ कचेरीसमोर थाली व ताली बजाओ आंदोलन 

147

 

प्रमोद झिले  – हिंगणघाट  ( येरला )

वर्धा – केंद्र सरकारने तूर,मुंग,उडीद या कडधान्यांची आयात मागे घेण्यात यावी व रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी करण्यात यावे या मागणीसाठी आज दि २० मे ला प्रहरच्या वतीने येथील उपविभागीय कार्यालया समोर ताली व थाली बजाव आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी प्रहारचे विदर्भ विभाग प्रमुख श्री गजू कुबडे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट/समुद्रपूर/सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
आज सायंकाळी 6 वाजता कोरोना संबंधी शासकीय नियम पाळून प्रहारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने लिहिलेले निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले.
बरोबर एक वर्षा पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विरुद्ध लढाई लढणाऱ्या योध्यासाठी सायंकाळी 6 वाजता टाळी व थाळी वाजविण्याचे आवाहन केले होते आणि त्या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळालेला होता.आज प्रहारचे द्रष्टे नेते ना.बच्चू भाऊ कडू यांनी अतिशय अडचणीत असलेल्या व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळी राजा संकटात असतांना त्याच्या व्यथा वेदनांकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी हे अभिनव असे ताली व थाली बजाव आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सायंकाळी 6 वाजता करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले व पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार आज सायंकाळी 6 वाजता मोदी सरकार हाय हाय च्या घोषणा देत ताली व थाली वाजवून केंद्र सरकारच्या शेतकरी हित विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
आज तहसील ऑफिस चौक हिंगणघाट येथे या आंदोलनात पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे,जगदीश तेलहांडे,रुपराज भगत,दिवाकर घंगारे,भाई मोहन पेरकुंडे,आकाश देवडे,विजय पडोळे,ज्ञानेश्वर हुलके,ईश्वर हेडाऊ,आकाश बाणमारे, नाना नागमोते,अतुल चिंतलवार, केशव लेडांगे इत्यादी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.