Home मराठवाडा विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर पोलिसांची पठाणी वसुली , ग्रामपंचायत ची सामान्य पावती देऊन...

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर पोलिसांची पठाणी वसुली , ग्रामपंचायत ची सामान्य पावती देऊन प्रवाशांची लूट..!

2059

मजहर शेख

नांदेड/माहूर  , दि.: १९  –  विदर्भ व मराठवाडा सीमेवरील यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव पोलिसांनी धानोडा या सीमा क्षेत्रावरील गावात पठाणी वसुली चा गोरख धंदा सुरू केला आहे. माहूर कडून येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील खाजगी वाहनांना थांबवून त्यांच्या कडून ग्रामपंचायतीच्या सामान्य पावती च्या नावावर दो शे रुपये उकडले जात आहे. दिवस भरात अशी शेकडो वाहने सीमा क्षेत्रातून जात असल्याने ही वसुली हजोरीच्या घरात असून पोलिसांना ग्रामपंचायत ची पावती देण्याचा अधिकार कोणी दिला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असून सामाजिक कार्यकर्ते बाबू खा फारुकी टाकळीकर यांनी या संदर्भात नांदेड व यवतमाळ या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने दिनांक २३ एप्रिल रोजी घेतला आहे. साधारण गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊन अंतर्गत लागू असलेले कडक निर्बंध आता एक जून सकाळी सात वाजेपर्यंत कायम राहणार आहेत.या दरम्यान अत्यावश्यक कारणासाठीच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना असेल आणि त्यासाठी ई-पास घ्यावा लागणार राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केला.परंतु वैद्यकीय व इतर महत्त्वाच्या कामासाठी जिल्ह्यात कुठे ही प्रवास करण्यासाठी ई पास ची गरज नसल्याचे शासनाचे म्हणणे असले तरी ही ई पास ची मागणी करून महागाव पोलिसांनी माहूर पासून ५ किमी अंतरावरील धानोडा येथे अनेक वाहनां रोखून धरत त्यांच्या कडून आंतरजिल्हा प्रवासाच्या नावावर दोनशे रुपयांची पावती देऊन नाहक वाहनधारकांना विटी धरले आहे. आज दिनांक १९ रोजी प्रकृती बरी नसल्याने सामाजिक कार्यकर्ते बाबू खा फारुकी टाकळीकर(वय 62) हे नांदेड कडे जात असताना त्यांना महागाव पोलिसांनी धानोडा येथे थांबवून ई पास ची मागणी केली.त्यांनी प्रकृती तपासणी साठी दवाखान्यात नांदेड ला जात असल्याचे पोलिसांना सांगितले,मात्र तपासणी नाक्यावरील पोलिसांनी तुम्ही आता यवतमाळ जिल्ह्यात आहात,तुम्ही नांदेड ला जात असले तरी आम्हाला त्याचे काही देणे घेणे नाही म्हणत ज्येष्ठ नागरिकाला अपमानास्पद वागणूक देऊन २०० रुपयांची पावती हातात दिली.व नंतरच पुढील प्रवासाची सोडले.हा प्रकार मागील १५ दिवसा पासून सुरु असून नागरिक लॉक डाऊन असल्याने कोण पोलिसांच्या तोंडी लागावं म्हणून नाक दाबून बुक्क्यांचा मार सहन करत २०० रुपये भुर्दंड देऊन प्रवास करीत आहे.विशेष म्हणजे पोलीस ग्राम पंचायत ची सामान्य पावती देत असून पोलिसांना ग्राम सेवकांच्या स्वाक्षरी ची पावती देण्याचा अधिकार कोणी दिला व ग्रामसेवकांनी पावती बुक पोलिसांच्या हवाली कशी केली हा संशोधनाचा विषय आहे शोध यवतमाळचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून नाहक वेठीस धरणार्‍या महागाव पोलिस व धानोडा येथील ग्रामसेवका विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी दिलेल्या तक्रारीत बाबू खा फारुकी यांनी केली आहे.