Home विदर्भ गोष्टी नका करू कृती करा’ जिल्हाधिका-यास आंदोलनाचा इशारा

गोष्टी नका करू कृती करा’ जिल्हाधिका-यास आंदोलनाचा इशारा

173
0

अमरावती बचाओं कोवीड फोर्स झाली आक्रमक

 प्रतिनिधी – मनिष गुडधे.

अमरावती – आज दिनांक १९ में रोजी मा. जिल्हाधिकारी , अमरावती यांना रितसर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.अमरावती जिल्ह्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य यंत्रणा पुर्णपणे खराब अवस्थेत आहे. सुपर मधील मृत्यु दर खुप जास्त आहे. तसेच रेमडीसीवर इंजेक्शन चा काळाबाजार झाल्याचेही उघड झाले.प्रशासन कठोर कार्यवाही करत नाही याचाच फायदा घेवुन खाजगी दवाखाने रुग्णांचे उपचाराच्या नावाने आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात करत आहेत. बेस्ट हाॅस्पीटल, बोंडे हाॅस्पिटल, पारश्री हाॅस्पिटल व श्रीपाद हाॅस्पिटल बद्दल पुराव्या सहीत श्री. राम लंके उप जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. कार्यवाही करतील असे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले. अनेक ठिकाणी नियम धाब्यावर ठेवल्याचे प्रशासनास निदर्शनास दिसले परंतु प्रशासन व खाजगी रुग्णालयाची काय साठ आहे? कारण कठोर कार्यवाही झालीच नाही. मग ते लेबोरेट्री असो की खाजगी कोवीड सेंटर! कोरोना चा कहर वेळीच दक्षता घेतली असती तर अमरावती जिल्यात ग्रामीण भागात करोनाचे जास्त रुग्ण निघाले नसते. ग्रामीण आरोग्य सुविधा तुटपुंज्या आहेत आणि पूर्ण भार अमरावती शहरातील आरोग्य यंत्रणेवर येत आहे, शहरी भागात कधी अति जास्त रुग्ण वाढले तर पूर्ण आरोग्य यंत्रणा ढासळण्याची दाट शक्यता आहे.कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी निदर्शनास आणुन दिलेल्या बाबी अत्यंत आवश्यक आहे. २१ मे २०२० रोजी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या गाईडलाइन ची अवहेलना करणा-या खाजगी कोवीड हाॅस्पिटल वर त्वरित कठोर कार्यवाही करणे तसेच खाजगी कोविड सेंटर मधील फार्मेसी कडुन रुग्णाची होणारी आर्थिक पिळवणुक रोखण्यात यावी. अमरावती जिल्ह्यात लसीकरण केंद्रात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणुन आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करणे.
ग्रामीण भागासाठी तालुका स्तरावर ०४ कार्डियक एम्बुलेंस व कमीतकमी १०० बेड आँक्सीजन सिलिंडर आणि सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर उभारणे किंवा सुरु असलेले कोविड सेंटरची क्षमता वाढवणे. मुबलक मनुष्यबळ वैद्यकीय मदतीसाठी अमरावती जिल्ह्यातील मदत करणा-या लोकांची रुग्णसेवकांची किंवा आरोग्य क्षेत्रात शिक्षण घेतलेले मनुष्यबळ मानधनावर निवडणे. केरळ पेटर्न व मुंबई पेटर्न अमरावती जिल्ह्यात राबविणे. कोरोना ची तिसरी लाट लक्षात घेता आँक्सीजन सिलेंडर क्षमता व नियोजन आखावे मुबलक प्रमाणात औषधांचा साठा वाढवावा. जसे रेमडीसीवर इंजेक्शन. मानसिक संतुलन व ताणतणाव दुर करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात पोस्ट कोवीड काउन्सलिंग सेंटर (PCCC) उभारण्यात यावे. अमरावती जिल्ह्यास उपरोक्त बाबी सुरळीत चालण्यासाठी कोवीड व्यवस्थापन आणि जनतेला उद्भवणा-या अडचनीचे निवारण करण्यासाठी “Command and Control Central against COVID” चे गठन करुन ज़िल्हाधिकारी कार्यालय मध्ये कायमस्वरुपी बसविण्यात यावे. वरील सुचक बाबीं वेळीच कार्यन्वयीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अमरावती बचाओं कोवीड फोर्स ने जिल्हाधिकारी यांना दिला आहे निवेदन व चर्चा करतेवेळी
डॉ. अलिम पटेल- मुख्य मार्गदर्शक, श्रीमती शितल गजभिये- महिला सहायक, रुगणसेवक सुरेश तायडे-हेल्थ वर्कर, सैय्यद नसीम- हेल्थ वर्कर,धम्मपाल पिलावन- प्रसार माध्यम प्रमुख, मंगेश कनेरकर- सोशल मीडिया प्रमुख गोपाल ढेकेकर- सदस्य, यश सिरसाठ- सदस्य, रुपेश कुत्तरमारे, बाळासाहेब गारोडे,संदीप भालाधरे, राज तानोडकर, प्रकाश अंभोरे किरण उपस्थित होते.