बुलडाणा

शिव केबल सेनेच्या जिल्हा चिटणीसपदी जितेंद्र कायस्थ यांची निवड

Advertisements

सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन…!

अमीन शाह

बुलडाणा , दि. २० :- शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत तसेच आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वात काम करणा-या शिव केबल सेनेच्या बुलडाणा जिल्हा चिटणीसपदी सिटी डिजीटलचे संचालक तथा सिटी न्यूजचे मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात शिव केबल सेनेचे अध्यक्ष आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन जितेंद्र कायस्थ यांची निवड केली. जिल्ह्यात लवकरच शिव केबल सेनेचा जोमाने विस्तार केला जाईल, असे जितेंद्र कायस्थ यांनी सांगितले.

शिव केबल सेनेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून केबल नेटवर्कचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत राज्य कार्यकारिणीचे नव्याने गठन करण्यात आले. शिव केबल सेनेच्या राज्य अध्यक्षपदी आमदार सुनील राऊत, उपाध्यक्षपदी आमदार सुभाष भोईर, आमदार प्रकाश कातर्पेकर, आमदार मंगेश कुडाळकर, सुनील (बाळा) कदम, सरचिटणीसपदी विनय (राजू) पाटील, तर खजीनदार म्हणून भूपेश गुप्ता यांची निवड करण्यात आली. याच बैठकीत आमदार सुनील राऊत यांनी जितेंद्र कायस्थ यांची बुलडाणा जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती केली. जिल्ह्यात आता शिव केबल सेनेच्या विस्ताराचे अधिकार जितेंद्र कायस्थ यांना देण्यात आले असून, जिल्ह्यात लवकरच संघटनेचा विस्तार केला जाईल, असे कायस्थ यांनी सांगितले.

शिव केबल सेना ही केबल ग्राहकांच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे. नुकतेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणा-या ट्राय ने केबलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ज्याचा प्रत्यक्षरित्या बोजा हा केबल ग्राहकांवर पडत आहे. ट्रायच्या या धोरणाविरोधात तसेच केबल ग्राहकांवर जास्त दराचा बोजा कमी करण्याच्या मागणीसाठी शिव केबल सेना आगामी काळात काम करणार असल्याची माहिती जितेंद्र कायस्थ यांनी दिली आहे.

जितेंद्र कायस्थ हे हे गेल्या 27 वर्षांपासून केबल व्यवसायात असून, जिल्ह्यातील केबल चालकांसाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. सरकारने केलेल्या दरवाढी विरोधात केबल ग्राहकांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चादेखील काढला होता. कायस्थ यांचे हे कार्य पाहूनच त्यांची ही निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या निवडीबद्दल जितेंद्र कायस्थ यांचे जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.

You may also like

बुलडाणा

रुग्णांचा खाजगी कोव्हिड सेंटर व शासकीय कोव्हिडं सेंटर बद्दल असलेला संभ्रम दूर करा

  *रुग्णांचा हेडगेवार कोव्हिड सेंटर व अनुराधा कोव्हिड सेंटर बद्दल असलेला संभ्रम दूर करा* प्रशांत ...
बुलडाणा

डॉ , पायल तडवी आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी

.   आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यावर कार्यवाही करा , मलकापूर प्रतिनिधी , डॉ. पायल ...
बुलडाणा

बुलडाणा जिल्हा मजदूर संघाची चिखली तालुका कार्यकार्यकारिणी जाहीर

बुलडाणा जिल्हा मजदूर संघाची चिखली तालुका कार्यकार्यकारिणी जाहीर प्रतिनिधी , चिखली / बुलडाणा जिल्ह्यात बांधकाम ...