Home जळगाव अल्लाह सर्व मानवतेला या कोरोना विषाणूंपासून तूच वाचवू शकेल , “रमजान ईद...

अल्लाह सर्व मानवतेला या कोरोना विषाणूंपासून तूच वाचवू शकेल , “रमजान ईद निमित्त सर्व दुर प्रार्थना “

55
0

ईदगाह मैदानावर महापौर सह सर्व प्रशासनाने दिल्या शुभेच्या

रावेर (शरीफ शेख)

कोरोना एक साथीचा रोग असल्यास, त्यापासून मुक्त कर,एखादा आजार असल्यास त्यावर उपचार आणि औषधोपचाराचे मार्गदर्शन कर व कोरोना जर काही षडयंत्र असेल तर ते उघड कर आणि या सर्व मानवतेला कोरोना पासून तूच वाचवू शकतो म्हणून तूच आमचे संरक्षण कर अशी अंतर्मुख प्रार्थना आज सर्व दूर करण्यात आली.
ईद ची नमाज घरी, काही प्रमाणात मस्जिद व ईद गाह मध्ये मर्यादित संख्येत करण्यात आली त्यात ही प्रार्थना करण्यात आली।

*मुस्लिम ईदगाह मध्ये दोन सणा निमित्त शुभेच्या*
रमजान ईद व अक्षयतृतीया एकाच दिवशी असल्याने महापौर जयश्री महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील,जिल्हा अधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे,आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व एम आय डी सी चे पो नी प्रतापसिंग शिकारे यांनी उपस्थिती दिली असता त्यांचे विधिवत स्वागत ईद गाह ट्रस्ट तर्फे गफ्फार मलिक,फारूक शेख,अश्फाक बागवान,ताहेर शेख, अनिस शाह,जाफर शेख, ऍड आमीर शेख यांनी केले.
हाजी गफ्फार मलिक यांनी ट्रस्ट चा आढावा सादर केला

*उपस्थितांचे शुभेच्या व मार्गदर्शन*

सर्व प्रमुख अतिथींनी ईद च्या शुभेच्या देऊन मार्गदर्शन केले त्यात प्रामुख्याने चंद्रकांत गवळी, सतीश कुलकर्णी,डॉ प्रवीण मुंडे,अभिजित राऊत व जयश्री महाजन यांचा समावेश होता.

*कब्रस्थान कार्या वाबत ट्रस्ट चे अभिनंदन*

कोरोना काळात कब्रस्थान चे कार्याची माहिती ,आकडे मोड, जन्म संख्या, मृत्युदर व जळगाव चा विस्तारा बाबत ची माहिती सचिव फारूक शेख यांनी मांडुन शासना कडे दोन्ही बाजूला कब्रस्थान ची मागणी केली असता त्यास आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी होकार दिला तर जिल्हा अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करण्याचे सांगून ट्रस्ट च्या कार्याचे कौतुक केले.

*अनिस शाह चे विशेष कौतुक*

कोरोनात मृत्यू पावलेल्यांचा दफन विधी चोख पारपडल्या बाबत ट्रस्ट चे सह सहचिव अनिस शाह यांचे विशेष कौतुक करण्यात आले।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुफ्ती हारून यांनी तर सूत्र संचलन व आभार फारूक शेख यांनी व्यक्त केले.

Unlimited Reseller Hosting