Home मराठवाडा कट्टर रणरागिणी ग्रुप तर्फे उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती संभाजी महाराज जंयती साजरी

कट्टर रणरागिणी ग्रुप तर्फे उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती संभाजी महाराज जंयती साजरी

331

जालना- लक्ष्मण बिलोरे

महापुरुष आणि त्यांच्या विचारांचा वारसा ही आपल्याला लाभलेली अमूल्य देणगी आहे. महपुरूषांचे विचार जयंतीच्या निमित्ताने समाजमनात अजरामर करणं आणि ते सर्वदूर पोहचवणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे. १४ मे म्हणजे धर्मवीर, अजिंक्य योद्धा, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती.

सध्या सर्वञ कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम रद्द आहे, पण शंभुराजे जंयतीच्या निमित्ताने त्याच्या ज्वलंत इतिहास लोकापर्यत पोहचविणे हा अठ्ठाहास मनामध्ये ठेवुन कट्टर रणरागिणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप दादा गाडेकर याच्या नियोजनातुन ऑनलाइन व्याखानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाची सुरवात राजमाता जिजाऊ माँसाहेब, शिवरायाची आरती आरती करण्यात आली. तसेच सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाचे सुञसंचालक संदीप दादा गाडेकर यानी केले, यानंतर व्याख्यान आयोजित केले होते. कट्टर रणरागिणी ग्रुप च्या महिला अध्यक्षा, शिवकन्या प्रा कु. श्रध्दा नंदकुमार शेट्ये यांनी शंभुराजे च्या चरीञावर जिवत व ज्वलंत इतिहास सांगितला. त्याच्या व्याख्यानाने सर्वच जण शेवटी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानाचा प्रसंग ऐकून भावुक झाले. या व्याख्यानामध्ये स्वरचित चारोळ्या सादर करण्यात आल्या.
कार्यक्रमाची सांगता करताना उपस्थित असलेल्या रणरागिणी यांनी त्याचे परीचय दिले व शंभुराजांच्या चरीञावर आपले मत व्यक्त केले. यामध्ये कट्टर रणरागिणी ग्रुप च्या उपाध्यक्षा ऋतुजा ताई जाधव अमरावती जिल्हा अध्यक्षा प्रियंका साबळे , नेवासा तालुका अध्यक्षा चैताली भाकरे, अदीती ताई, प्रतिक्षा बेडके, सुवर्णा मोरे, या सर्व पदाधिकारी ने आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले.