Home विदर्भ भिष्णुर नजिक टँकर पलटला , “चालक वाहक जखमी”

भिष्णुर नजिक टँकर पलटला , “चालक वाहक जखमी”

176
0

इकबाल शेख – वर्धा

तळेगांव (शा.पं.) :- येथील राष्ट्रीय महामार्गावरील भिष्णुर फाट्याजवळ जी.जे. ०६ अे. एक्स. ३०८० क्रं. चा टॅंकर उलटला या अपघातात सुदैवाने जिवित हानी झाली नाहि.
मुंबई येथुन नागपुर कडे डांबर घेवुन जाणारा टॅंकर शनिवारला दुपारच्या सुमारास स्टेअरिंग लाॅक झाल्यामुळे असंतुलीत होवुन रोडच्या कडेला पलटला.

यामध्ये चालक मोहम्मद सलमान रा.मुंबई व त्याचा सहकारी मोहम्मद कयुम रा. मुंबई हे दोघेही जखमी झाले. अपघाताची माहिती तळेगाव पोलीस स्टेशनला मिळताच. पोलीस उपनिरिक्षक हुसेन शहा, पोलीस शिपाई मंगेश मिलके, अनिल चिलगर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालय आर्वी येथे रवाना केले.या प्रकरणी तळेगाव पोलीस स्टेशनला नोंद घेवुन अधिकचा तपास तळेगाव पोलीस करीत आहे.