Home विदर्भ घाटंजी पंचायत समिती अंतर्गत विविध विकास कामासाठी ग्रामपंचायतीला एक कोटी चोवीस लक्ष...

घाटंजी पंचायत समिती अंतर्गत विविध विकास कामासाठी ग्रामपंचायतीला एक कोटी चोवीस लक्ष रुपये जनसुविधेसाठी विशेष अनुदान मंजूर..!

305

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी सन 2020-21 करिता जिल्हा नियोजन समिती कडून 1 कोटी 24 लक्ष रुपये मंजूर झालेले असुन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यवतमाळ जिल्हयातील सर्व पंचायत समितीला 2356.84 लक्ष रुपये निधी मार्च महिण्यात वितरित करण्यात आला आहे. दरम्यान, यापुर्वी पांचाळ यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे यांचे कडे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे विविध कामे मंजुर करण्या बाबतचा प्रस्ताव सादर केला होता, हे विशेष.
शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ग्रामपंचायतींना जन सुविधेसाठी विशेष अनुदान अंतर्गत कामाची निवड जिल्हा नियोजन समिती मार्फत करावयाची असल्याने सदरचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव चर्चेत ठेउन तीन कोटी (3000.00 लक्ष) रुपयांचा निधी यवतमाळ जिल्हयासाठी मंजूर करण्यात आला.
शासन निर्णयातील निर्देशान्वये स्मशानभूमी मध्ये दहनशेड बांधकाम, स्मशानभूमी पोहोचरस्ता, अंतर्गत रस्ते बांधकाम, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, पाणी पुरवठ्याची कामें तथा अनुषंगीक कामाची परिशिष्ट अ ब क व ड मध्ये वर्गवारी नमुद करुन एकून 867 कामाचे 3000.00 लक्ष रुपयाचा निधी यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समिती निहाय प्रस्ताव सादर करण्यात आल्याने सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
घाटंजी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत निहाय मंजूर कामें अशी; वघारा टाकळी येथील कब्रस्थानचे वाँलकंपाउंड बांधकाम करणे 5 लक्ष, सगदा नदीवर पायरीचे बांधकाम करणे 10 लक्ष, शरद येथील स्मशानभूमीत पोहच रस्ता 5 लक्ष, आमडी येथे दहनशेड बांधकाम करणे 5 लक्ष, दहेगांव येथे स्मशानभूमी पोहच रस्ता 5 लक्ष, पार्डी नस्करी येथे दहनशेड बांधकाम करणे 5 लक्ष, आमडी येथे स्मशानभूमी सौंदर्यीकरण व ईतर अननुषंगीक कामें 5 लक्ष, कुर्ली, सावरगांव मंगी, सायतखर्डा, देवधरी, वाढोणा, पंगडी, बोधडी, वघारा टाकळी, राजापेठ, सावंगी संगम, शिवणी, कोच्ची, आंबेझरी, जरंग, वासरी, जरुर, मोवाडा, आमडी, मांडवा, टिटवी, दडपापूर, अमरहीरा, घाटूंबा, चोरंबा, साखरा आदी ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन कामें करणे प्रत्येकी 1 लक्ष, तसेच कुर्ली येथील अंतर्गत सिंमेट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे 10 लक्ष, सावरगांव मंगी येथे अंतर्गत सिंमेट काँक्रिट रस्ता 5 लक्ष, येरंडगांव येथे अंतर्गत सिंमेट काँक्रिट रस्ता 4 लक्ष, आंबेझरी ते आसोली जोड रस्ता 8.50 लक्ष, शिवणी टाकळी जोड रस्ता बांधकाम 8.50 लक्ष, मोवाडा व जरंग येथे अंतर्गत सिंमेट काँक्रिट रस्ता 4 लक्ष, घोटी, चिखलवर्धा व येरंडगांव येथे अंतर्गत सिंमेट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे प्रत्येकी 5 लक्ष ईत्यादी ग्रामपंचायती मधील कामें मंजुर झालेली असून सदर कामाचा निधी सुद्धा जिल्हा परिषदे कडून वितरित करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात अ कामाची संख्या 122, ब कामाची संख्या 17, क कामाची संख्या 515 व ड कामाची संख्या 213 अशी एकुन कामाची संख्या 857 आहे. एकंदरीत सदरची कामें शासनाच्या नियमानुसार करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.