Home मराठवाडा मराठा नेत्यांनी राजकीय पक्ष, संघटनेच्या बेड्या तोडून समाजासाठी एकत्र आले पाहिजे  —...

मराठा नेत्यांनी राजकीय पक्ष, संघटनेच्या बेड्या तोडून समाजासाठी एकत्र आले पाहिजे  — शिवाजी सुरासे

406

मराठा समाज मोठा आहे परंतु समाजात एकजुट नाही.मतांच्या गणिताची गोळा बेरीज करणारे राजकीय मराठा नेत्यांनी आजवर समाजापेक्षा खुर्चीला अधिक महत्व दिले आहे, एरव्ही , मोठमोठ्या सभा गाजविणारे मराठा नेते समाजाचा प्रश्न आला तर मुग गिळून गप्प बसतात म्हणुनच मराठ्यांना आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे ,कशी जळजळीत प्रतिक्रिया किसान करणी सेनेचे अध्यक्ष शिवाजी सुराचे यांनी व्यक्त केली.

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

आज मराठा आरक्षण काेर्टाने रद्द केले हि मराठा समाजा साठी माेठी वाईट बातमी समजली पाहिजे.मराठा समाज खुप माेठा आहे परंतु समाजात एकजुट, एक संघ नसल्या मुळे मराठा समाजाला हार पत्करावी लागली
सर्व मराठा समाजातील राजकिय जोखड झुगारून पक्ष, संघटनांच्या बेड्या ताेडुन
मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाने एकजुटीने संघर्ष करणे गरजेच आहे.
मराठा समाजावर एक प्रकारे अन्याय होत असताना आज राेजी आपल्यासाठी कुठलाच राजकिय पक्ष, संघटना कामा आली नाही.
त्यामुळे आपण आपल्या समाजा
साठी आणी समाज हितासाठीच यापुढे एकत्र आले पाहिजे, वेळप्रसंगी समाजासाठी मैदानात उतरून
लढले पाहिजे. मराठ्यांनाे शपत घ्या
जाे पर्यंत आरक्षण मिळत नाही ताे पर्यंत लढा थांबवयाचा नाही. आता यापुढे एकच मिशन मराठा आरक्षण. पक्ष ,पार्टी गेली खड्यात अशीही संतापजनक प्रतिक्रिया सुरासे यांनी दिली.