Home जळगाव मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी जे.के.पाटील

मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी जे.के.पाटील

70
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली आहे.आतापर्यंतच्या इतिहासात जिल्ह्याला हा मान दुसऱ्यांदा मिळाला आहे.

आज (ता १) सायंकाळी महामंडळाच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये ही निवड करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड (सांगली) यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.श्री पाटील रावेर तालुक्यातील विकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. जळगाव जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ९ वर्षे संपादक,९ वर्षांपासून अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ८ वर्षांपासून उपाध्यक्ष ही पदेही त्यांनी भूषविली आहेत. नेवासा येथे २०१३ मध्ये झालेल्या मुख्याध्यापक महामंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांना मिळाले होते. ही निवड २ वर्षांसाठी आहे. यापूर्वी उचंदा (ता मुक्ताईनगर) चे यू डी पाटील यांना २००४ मध्ये हा मान मिळाला होता.
त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.