Home नांदेड नांदेड येथे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न – १०७...

नांदेड येथे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न – १०७ बाटल्या रक्त संकलीत

144
0

राजेश एन भांगे

कोरोना संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्या रुगणांच्या उपचारासाठी रक्ताची गरज भासत असल्याचे लक्षात घेऊन टीचर्स क्लब रुग्णालय कौठा नांदेड येथे नांदेड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तरी यावेळी रक्तदान शिबाराचे उद्घाटन हरिहरराव भोसिकर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्टी जिल्हाध्यक्ष नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल चे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील , मनपा नांदेड चे माजी विरोधी पक्ष नेते जीवन पा. घोगरे, माजी सभापती भाऊसाहेब गोरठेकर,राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर , प्रा . मझरोद्दीन सर ,राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष शिवाजी कदम, शिवाजीराव वाडीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपाध्यक्ष रेखाताई आहिरे, रवींद्रसिंघ पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच या रक्तदान शिबिरात १०७ रक्त दात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तरी रक्तदान शिबीरातील रक्त गोळवलकर गुरुजी रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले आहे.

या रक्तदान शिबाराचे नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्टीचे जिल्हासरचिटणीस डी बी. जांभरूनकर, व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष गजानन पापंटवार यांनी केले.

तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेळगे सर, नारायण शिंदे,
डॉ. तहाडे साहेब, अनमोलसिंग कामठेकर, सूर्यकांत कावळे, गोपाळराव पेंडकर, सूर्यकांत गायकवाड, डॉ. मंडले मॅडम, सुरेंद्र डांगे यांनी परिश्रम घेतले.