Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव येथे तरूणांनी केला स्वामी समर्थ मंदिर परिसर स्वच्छ

कुंभार पिंपळगाव येथे तरूणांनी केला स्वामी समर्थ मंदिर परिसर स्वच्छ

848

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत कडे स्वच्छतेविषयी वारंवार सुचना देवूनही ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने येथील सामाजिक कार्याचे अंग असलेल्या तरूणांना शेवटी हातात फावडे घेवून नाल्या काढून परिसरात साफ सफाई करावी लागली.

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीने गावांतील, सार्वजनिक स्वच्छता, वेळच्या वेळी गावातील तुंबलेल्या नाल्या काढणे जरूरी आहे ,परंतु ग्रामस्थांनी स्वच्छतेबाबत मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात नाल्या तुंबलेल्या असतांना घाण पाणी रस्त्यावर येवू लागले त्यामुळे दुर्गंधी पसरली होती.डासांचा उपद्रव वाढला होता.स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होवू लागला.येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर महाराज लोंढे, भास्कर राऊत,केशव टेकाळे यांनी स्वत: फावडे हाती घेवून तुंबलेल्या गटार उपसली, परिसरातील कचरा गोळा करत साफसफाई केली या तरूणांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.