Home नांदेड आमदार भीमराव केराम सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती करण पुजार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण!

आमदार भीमराव केराम सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती करण पुजार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण!

136
0

मजहर शेख,

माहूर किनवटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तब्बल अकरा रुग्णवाहिका मंजूर…

आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाचे फलित!

 

किनवट,दि : ३०:- किनवट/माहुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मंजूर करून आदिवासी दुर्गम भागातील सामान्य नागरिकांना आरोग्यच्या दृष्टीने वेळीच उपचार मिळावे या उदांत हेतूने प्रेरित आमदार भीमराव केराम यांनी गतवर्षी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रारंभी किनवटसाठी तीन आणि आदिवासी उपयोजना अंतर्गत माहूरसाठी तीन रुग्णवाहिका मंजूर करून उपलब्ध करून दिले होते.माहूर आणि किनवट तालुक्यातील उर्वरित आकरा प्राथमिक आरोग्य केंद्रनाही रुग्नवाहिका उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला होता,त्याचेच फलित म्हणून आज (ता.२९) रोजी शासन स्तरावरून माहूर आणि किनवट तालुक्यातील आकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सर्व सुविधा युक्त रुग्णवाहिका जिल्हा परिषद स्तरावर उपलब्ध झाल्या असून लवकरच ते माहूर,किनवट तालुक्यातील आरोग्यसेवेसाठी रुजू करण्यात येणार आहे.तत्पूर्वी रुग्णवाहिका किनवट मध्ये दाखल झाल्यानंतर (ता.३) मे रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार भीमराव केराम व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते विधीवत लोकार्पण करून रुग्णसेवेत अर्पण केली जाणार असल्याची माहिती आमदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

माहूर आणि किनवट तालुक्यातील मागासलेल्या व तसेच अति दुर्गम व डोंगराळ भागातील पंचायत विस्तार अधिनियम अर्थात पेसा अंतर्गत आदिवासी उपयोजना खालील समाविष्ट गावांमध्ये नागरिकांच्या आरोग्य सुविधेला प्रथम प्राधान्य देत आमदार भीमराव केराम यांनी प्रारंभी पासून ते आज अखेरपर्यंत दऱ्याखोऱ्यातील खेडेगावात आरोग्य सुविधा अधिक अधिक कशी बळकट करता येईल या हेतूने प्रेरित आपला स्थानिक विकास निधी व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीची सांगड घालून अत्याधुनिक दर्जेदार रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर,रेमेडीसिवर इंजेक्शन्स,औषध साठा अत्यावश्यक आरोग्यविषयक साधनसामग्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्र पासून माहूर आणि किनवट मधील कोविड केअर सेंटर पर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी शक्य ते सर्व पर्याय वापरून या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या आरोग्यविषयक धोरणाचा परिपाक शासनाकडे केलेल्या पाठपुरावा चे फलित म्हणून आज माहूर आणि किनवट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुविधायुक्त आकरा रुग्णवाहिका रुग्नवाहिका माहूर तालुक्यातील इवळेश्वर,आष्टा,सिंदखेड़,दहेली,उमरी बा. कोठारी,शिवनी,अप्परावपेठ,राजगड,बोधड़ी,
जलधारा साठी राष्ट्रीय आपत्ति व्यवस्थापन योजने अंतर्गत मंजूर झाल्या आहेत.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा परिषद ला उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिका जिल्हा स्तरावरावरून तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फ़त संबधीत ठिकाणी रुग्नवाहिका जिल्हाधिकारी,जिल्हाआरोग्य अधिकारी,यांनी सुपुर्द करावी अशी विनंती आ.केराम यांनी केली आहे.सदर रुग्नवाहिका समाजातील दुर्बल घटक,सामान्य नागरिकांना जीवनदाई ठरणार असल्याने याचा वापर सामान्य जनतेच्या आरोग्य अबाधित राखण्यासाठी करावा असे आवाहन ही आमदार भीमराव केराम यांनी केले असून जनतेच्या आरोग्य हिता साठी पहिलेल स्वप्न साकार झाल्याने आमदार केराम यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे,पालक मंत्री अशोकराव चव्हाण,सोबतच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांचे आभार व्यक्त केले असुन या पुढे ही माहूर आणि किनवट तालुक्यातील डोंगराळ भागातआरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

Unlimited Reseller Hosting