Home जळगाव मेरा क्या कसूर था अब्बू अम्मी ????

मेरा क्या कसूर था अब्बू अम्मी ????

885
0

अन्न पाण्या विना कनिज तडफडून अल्लाह ला प्यारी झाली ,

आई बापावर गुन्हा दाखल ,

अमीन शाह

जळगाव – अपशकुनी म्हणत पोटच्या मुलीचा छळ करून, तिला 15 दिवस अन्नपाण्याविना डांबून ठेवल्याने अखेर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कनीज फातेमा शेख जावेद अख्तर (वय11) असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावातील पिंप्राळा हुडको येथील राहत्या घरी कनीजचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी कुणाला काहीही न सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी कनीजचा मृतदेह दफन केला. त्यानंतर दोघे बेपत्ता झाले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच कनीजचा मामा अजहर व आजी-आजोबा यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर बुधवारी कनीजचा मृतदेह बाहेर काढून शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यावेळी कनीजच्या पोटात अन्न-पाणी नव्हते. कुपोषण, भुकेमुळे तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.दरम्यान, कनीजची आई नाजीया परवीन हिला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. तिने दिलेल्या जबाबानुसार, कनीजच्या जन्मानंतर तिच्या आजीचा ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर 2 वर्षांनी जावेदच्या मेडिकल दुकानास आग लागून मोठे नुकसान झाले. या घटनांमुळे वडिल जावेद याने कनीजला अपशकुनी असल्याचा समज करून घेतला. तेव्हापासून तो कनीजला मारहाण करत असे. कनीजला पुरेसे जेवनही दिले जात नव्हते. तिला घराबाहेर पडण्यासही बंदी होती. तिला सतत मारहणा केली जाई. तिला एकदा पाठीत कुकर फेकून मारले होते. त्यामुळे तिच्या पाठिला गंभीर दुखापत झाली होती.जावेद याने कनीजला 15 दिवसांपासून जेवण न देता डांबून ठेवले. अशाच अवस्थेत तिला मारून टाका असे जावेदने पत्नीला सांगितले होते. अखेर तिचा 23 तारखेला मृत्यू झाला. यानंतर तिला दफन करून जावेद व त्याची पत्नी जळगावातून बेपत्ता झाले होते.
याप्रकरणी पोलिसांनी कनीजच्या आई-वडिलांविरोधात कलम 304, 323, 506, 201, 34 व बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.