Home विदर्भ मुख्यालयी दांडी मारणाऱ्या तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्याकावर कारवाई करा- राम जाधव

मुख्यालयी दांडी मारणाऱ्या तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्याकावर कारवाई करा- राम जाधव

710

प्रतिनिधी महागाव

यवतमाळ – ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक गावांमध्ये तलाठी,ग्रामसेवक व कृषिसहाय्यक फिरकतच नसल्याचे नसून मुख्यालयी दांडी मारत आहेत.. मंडळ कार्यालयात बसूनच मुख्यालयाचा कारभार करण्यात येत असल्याची तक्रार शेतकरी पुत्र म्हणून ओळख असणारे तसेच महिती अधिकार कार्यकर्ता प्रचारप्रमुख राम जाधव यांनी तक्रार टाकली आहे.

महागाव तालुक्यातील गावांमध्येतर चक्क तलाठ्यांनी खासगी व्यक्तींची नेमणूक केली असून, दाखले व इतर महत्वाचे कागदपत्र देण्याचे काम करत असून काही गावातील तर कोतवाल कागदपत्रासाठी तर शेतकऱ्यांना पैश्याची मागणी करत आहेत.जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी मुख्यालयाला भेट देणे अपेक्षीत आहे. मात्र, गत काही दिवसांपासून कोरोनाच्या नावाखाली अनेक तलाठी नेमुन दिलेल्या गावांमध्ये फिरकतच नसल्याचे चित्र आहे. काही तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक हे तर महागाव,पुसद येथूनच कारभार हाकत असल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, परिसर सील करणे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे व तसेच विद्यार्थी व शेतकऱ्यांना वेळेवर गावातच दाखले मिळावे, यासाठी तलाठ्यांनी नेमुन दिलेल्या गावात भेट देणे अपेक्षीत आहे. मात्र, अनेक गावांमध्ये विशेषत: दुर्गम भागात तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहाय्यक फिरकतच नसल्याचे चित्र आहे. सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना तलाठ्यांचा,कृषी सहाय्यक यांचा शोध घ्यावा लागत आहे. अनेक गावांमध्ये खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. तेच ग्रामस्थांना कागदपत्रे वितरण करण्याचे काम करीत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहे. याचीच तक्रार राम जाधव यांनी तहसीलदार इसळकर यांच्याकडे केली असून मुख्यालयी दांडी मारणाऱ्य तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावे व दांडी मारणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी राम जाधव यांनी केली.