Home महत्वाची बातमी आईला मारतांना त्या चिमुकल्याने पाहिले राक्षस बापाने त्यालाही यमदसनी पाठवले,

आईला मारतांना त्या चिमुकल्याने पाहिले राक्षस बापाने त्यालाही यमदसनी पाठवले,

394
0

 

 

राक्षस बाप प्रेयसी सह अटक ,

अमीन शाह ,

पाटस ( ता . दौंड ) येथे मंगळवारी ( ता . २७ ) सकाळी एका घरात आईसह सात वर्षांच्या मुलाचा छताला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती . या घटनेचा यवत पोलिसांनी मोठया शिताफिने काही तासांतच पर्दाफाश केला . ही आत्महत्या नसून पतीने प्रियसीच्या मदतीने पत्नी व मुलाचा खून केल्याचे तपासात समोर आले .
लिना सचिन सोनवणे या मुलगा ओम व मुलगी वैष्णवी यांच्या सोबत पाटस येथे एका सदनिकेत राहत होत्या . मंगळवारी ( ता . २७ ) सकाळी लिना व ओम यांचा छताला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला . या बाबत मुलगी वैष्णवी हिने नातेवाईकांना माहिती दिली . दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस , पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील , पोलिस उपनिरीक्षक सचिन नागरगोजे , उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे , पोलिस हवालदार प्रदिप काळे , पोलिस नाईक विजय भापकर यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली . यावेळी नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला . पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली .यवत पोलिसांनी मोठया शिताफिने घटनेचा तपास सुरु केला . पोलिसांनी संशयावरुन पती सचिन याला ताब्यात घेतले . चौकशीत सचिन याने गुन्ह्याची कबुली दिली . सचिन व लिना हे मागील अंदाजे चार वर्षांपासून विभक्त राहत होते . तो पत्नी लिना हिला सतत सोडचिठ्ठी मागत होता . मात्र , त्याबाबत ती टाळाटाळ करीत होती . मंगळवारी ( ता . २७ ) रात्री आरोपी पती सचिन व प्रियसी रेणूका हे पाटस येथे लिनाच्या राहत्या घरी आले . यावेळी त्यांच्या सोबत आणखी एक महिला होती . त्यांनी लिना हिचा गळा दाबून खून केला . तसेच मुलगा हा जागा झाल्याने त्याचाही गळा दाबून खून केला . मुलगी वैष्णवी हिचा तोंडावर उशी ठेवून खून करण्याचा पयत्न केला . आत्महत्या दाखविण्यासाठी आरोपींनी मृत लिना व ओम यांच्या गळ्याला दोरी बांधून मृतदेह छताला लटकविला . या प्रकरणी पोलिसांनी सदर संशयित आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन सचिन व रेणुका हिला अटक केली . बुधवारी ( ता . २८ ) दुपारी दौंड न्यायालयात हजर केले असता , संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .