Home विदर्भ यवतमाळ जिल्हात 863 जण नव्याने पॉझेटिव्हसह 880 कोरोनामुक्त तर 30 मृत्यु

यवतमाळ जिल्हात 863 जण नव्याने पॉझेटिव्हसह 880 कोरोनामुक्त तर 30 मृत्यु

371

 

     यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात गत 24 तासात 863 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 880 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 30 मृत्यु झाले. यातील 24 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, दोन मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 5401 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 863 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4538 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7111 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2623 तर गृह विलगीकरणात 4488 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50995 झाली आहे. 24 तासात 880 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 42672 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1212 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.58 असून मृत्युदर 2.38 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 60,57, 54, 63,  वर्षीय पुरुष व 51, 70, 68 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52  वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 35, 52 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 80 वर्षीय पुरुष, वणी येथील 50 वर्षीय पुरुष व 65, 70 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष, राळेगाव येथील 40 वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील 65 वर्षीय महिला, दिग्रस येथील 55 वर्षीय महिला, केळापूर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 42 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 55 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेले दिग्रस येथील 70 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 45 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये दारव्हा येथील 67 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 65 वर्षीय महिला, पुसद येथील 70 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील 72 वर्षीय पुरुष आहे.

            बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 863 जणांमध्ये 525 पुरुष आणि 338 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 163 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 150, पांढरकवडा 104, घाटंजी 69, दारव्हा 66, उमरखेड 57, आर्णि 53, दिग्रस 48, पुसद 38, नेर 36, महागाव 34, मारेगाव 15, झरीजामणी 14, बाभुळगाव 2, राळेगाव 2, कळंब 1 आणि इतर शहरातील 11 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 405436 नमुने पाठविले असून यापैकी 399221 प्राप्त तर 6215 अप्राप्त आहेत. तसेच 348226 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

ऑक्सीजन व रेमडेसीवीर पुरवठाबाबत नियंत्रण कक्ष कार्यान्वित : जिल्ह्यात ऑक्सीजन व रेमडेसीवीरचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत असला तरी काही खाजगी कोव्हीड रुग्णालयासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे खाजगी कोव्हीड रुग्णालयात ऑक्सीजन, रेमडेसीवीर पुरवठा तसेच बेड व्यवस्थापनासंदर्भात व इतर काही तक्रारींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या सनियंत्रणाखाली 10 ते 12 जण कक्षात 24 बाय 7 कार्यरत आहेत. यासाठी 07232-240720, 240844 आणि 255077 हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वरील बाबींबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.