Home नांदेड लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार निधीतून मिळाली रूग्णवाहिका

लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार निधीतून मिळाली रूग्णवाहिका

547
  • राजेश एन भांगे

    देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार कै.रावसाहेब अंतापुरकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राथमिक आरोग्य केद्र लोहगाव येथे रूग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती.
    परंतु दुर्दैवाने काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झालेअसल्याने जिल्हा परिषदेच्या लोहगाव सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषदे शिक्षण व बांधकाम सभापती संजय अप्पा बेळगे यांच्या मार्गदर्शना खाली बिलोली देगलुर तालुक्याचे दिवंगत आमदार यांचे पुत्र जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करून लोकार्पण करण्यात आले.

    यावेळी नायब तहसीलदार श्री गौड, तालुका वैद्यकीय अधिकारी वाडेकर, काँग्रेसचे प्रवक्ता ग्रामीण दिलीप पाटील पांढरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, लोहगावचे सरपंच प्रतिनिधी यादवराव कोरनुळे, माजी सरपंच दत्ता पाटील पांढरे, ज्येष्ठ नेते रमेश पाटील शेटकर, ग्रामविकास अधिकारी ब्युटी जाधव,कासराळी ग्रामपंचायत सदस्य माजित सेठ, शिवा पाटील, दीपक संगलोड, पप्पू फुलारी, सामाजिक कार्यकर्ते संजू चरकूलवार सह मान्यवर आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना सभापती बेळगे म्हणाले जिल्ह्याचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बिलोली तालुक्याचा विकासाचा वसा अंतापूरकर साहेबांनी घेतला होता तो शेवट पर्यंत आम्ही विकास करून तळागाळातील लोकांना मदत करू असे वचन दिले आणि प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगावला साडेचार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून अजून जरी लागत असला तरी तो देण्याचा प्रयत्न करू.
    तसेच यावेळी जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य केद्राची पाहणी केली विकासाच्या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही दिली.