Home बुलडाणा रेती माफिया कडून पूर्णा नदी पात्राच्या शेजारील शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी मात्र...

रेती माफिया कडून पूर्णा नदी पात्राच्या शेजारील शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी मात्र भ्रष्ट अधिकारी गप्प.

738

रेती घाट वर आमची टीम गेली असता तलाठी मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने सर्रास अवैध्य रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याचे दिसून आले.

( बुलढाणा प्रतिनिधी सिद्धार्थ काळे ) 

संपूर्ण देशामध्ये कारोना महामारी असताना या मध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत त्याच अनुषंगाने या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला घरी राहा व सुरक्षित राहून काळजी घेण्याचे आव्हान करत आहेत परंतु याच लॉकडाउनच्या आड मधून बुलढाणा जिल्हा लोणार तालुक्यामधील सावरगाव तेली हद्दीतील पूर्णा नदी पात्रांमधील अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आले सदर ठिकाणी पूर्णा नदीच्या पात्रात शेजारील शेतकरी अविनाश राठोड गणेश पवार या दोन शेतकरी रात्री शेतामध्ये गेले असता त्याच्या विहिरीच्या शेजारी नदी पात्राच्या शेजारील रेती उत्खनन पोकलेन मशीनच्या साह्याने उत्खनन होत असल्याचे दिसून आले .

त्यावेळी त्यांनी सदर पोकलेन चालकास उत्खनन करण्यास थांबवली व त्यांनी संबंधित ठेकेदार मुकेश बागडिया राहणार बीबी यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता सदर ठेकेदाराने फोनवरून सदर शेतकरी यांना जर तू जेसीबी च्या समोर आलास तर तुला पूर्णा नदीमध्ये जीसीबीने गाडू अशा शब्दात मुकेश बागडिया यांनी अविनाश राठोड व गणेश पवार यांना धमक्या दिल्या यांमुळे सदर शेतकरी यांच्या मध्ये व त्याच्या परीवरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या विरोधामध्ये या ठेकेदारावर ती कारवाई व्हावी यासाठी गणेश पवार, अविनाश राठोड यांनी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना रजिस्टर पोस्ट करून रीतसर लेखी तक्रार केलेली आहे व यांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा यासाठी आमचे प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत आमच्या प्रतिनिधीने सदर घाटाची पाहणी केली असता त्या ठिकाणी सर्रास मोठ्या प्रमाणात शासनाच्या नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहेत. मोठ्या प्रमाणात जेसीबी पोकलेन च्या साह्याने रेतीचे उत्खनन सुरु आहे,त्यामुळे नदी पात्रामध्ये मोठे मोठे दहा ते पंधरा फूट खडे हे करत आहेत त्या मुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल असे कृत्य सदर ठेकेदार करत आहेत हे उत्खनन संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्या आशीर्वादाने होत आहे असे दिसून आले,तेव्हा आम्ही त्या ठिकाणी तलाठी दराडे यांना रेती वाहतूक करणाऱ्या गाड्याची पाहणी चेकिंग करण्यासाठी बोललो असता त्यांनी खुर्चीवर ती ठाण मांडून बसले होते परंतु गाड्याची चेकिंग देखील करत नव्हते जेव्हा आम्ही आग्रह केला तेव्हा गाड्यांमधील रेती रॉयल्टी चेक केले असता आमच्या असे निदर्शनास आले की ज्या गाडीमध्ये 6 ब्रास रेती असते त्या गाडीची रॉयल्टी पावती ही तीन ब्रास आढळून आली व या पावतीवर ती दिवसभर अवैध्य रेती वाहतूक होत असल्याचे आमच्या लक्षात आले तेव्हा आम्ही तलाठी दराडे यांना सदर गाडीवरती आपण काय कारवाई करणार आहात तेव्हा त्यांनी त्या गाडीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही व सदर माल खाली करून घेतला नाही जेव्हा आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ते आम्हाला प्रतिक्रिया देण्यास टाळत होते व वरून आम्हाला प्रतिक्रिया द्यायला सांगितलेले नाही असे सांगत होती त्यामुळे या ठिकाणी सदर तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या आशीर्वादाने हे ठेकेदार अवैध उत्खनन व वाहतूक करत आहे असे आम्हाला जाणवली त्यामुळे सदर तक्रारदर यांनी आमच्याकडे या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आमच्या माध्यमातून अशी मागणी केली आहे की तलाठी मंडळ अधिकारी तहसिलदार यांना बडतर्फ करून यानीची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी केलेली आहे व सदर रेतीघाट ठेकेदार यांचे सर्व ठेके रद्द करून त्यांच्यावरती फोजदारी कारवाई करण्यास मागणी केलेली आहे. आता याकडे जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी कशी कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.