Home मराठवाडा सलग दुसऱ्या वर्षीही,वर्षानुवर्षांची परंपरा‌ खंडित

सलग दुसऱ्या वर्षीही,वर्षानुवर्षांची परंपरा‌ खंडित

98
0

जांब समर्थ येथील यात्रोत्सव रद्द

जांबसमर्थ ही समर्थ रामदास स्वामी यांची जन्मभूमी आहे तर येथील श्रीराम मंदिर दक्षिण अयोध्या म्हणून ओळखले जाते.

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे दरवर्षी गुडीपाडवा ते रामनवमी पर्यंत साजरा होणारा श्रीराम व श्री समर्थ रामदास स्वामी जन्मोत्सव सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही रद्द करण्यात आला आहे. फक्त सकाळी पुजाऱ्याच्या हस्ते दोन्ही मंदिरात विधिवत पूजा होईल.जालना
जिल्हाधिकारी श्री रविंद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार जमावबंदी असल्याने जन्मोत्सव व यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे . गेल्या पाच शतकांची परंपरा असलेला श्रीराम जन्मोत्सव व श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्मोत्सव कोरोना महामारिच्या पार्श्वभुमीवर खंडित झाला आहे.मिळालेल्या माहिती नुसार गेल्या ८७ वर्षांपासून साजरा होता असलेला श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार नाही , परंतु कुठेही गर्दी करून नियमाचे उल्लंघन करू नये व आपल्या घरूनच श्रीराम व समर्थ रामदास स्वामी यांचे दर्शन घेऊन उत्सव साजरा करावा,असे आवाहन श्रीराम मंदिर व समर्थ मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Unlimited Reseller Hosting