Home मराठवाडा “हरवलेली माणसं ‘ या पुस्तकाच्या सन्मानार्थ लेखक दादासाहेब थेटे यांचे छायाचित्र पोस्टाच्या...

“हरवलेली माणसं ‘ या पुस्तकाच्या सन्मानार्थ लेखक दादासाहेब थेटे यांचे छायाचित्र पोस्टाच्या तिकिटावर

305

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

अवघ्या दोन महिन्यात पुस्तकाच्या तीन यशस्वी आवृत्या प्रकाशित झाल्यानंतर “हरवलेली माणसं” या पुस्तकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. नवी मुंबई येथील राज्य कर आयुक्त श्री मेहबूब कासार यांनी हरवलेली माणसं आणि त्याचे लेखक व घनसावंगी तालुक्यातील दैठणा खुर्द गावचे भूमिपुत्र दादासाहेब थेटे यांच्या सामाजिक जाणिवांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय पोस्टाच्या तिकीटावर दादासाहेब थेटे यांच्या छायाचित्र असलेल्या तिकिटाचे प्रकाशन केले. त्याच तिकिटांचा वापर करून नवी मुंबई राज्यकर आयुक्त मेहबूब कासार यांनी लेखक दादासाहेब थेटे यांना सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चार पानी पत्र लिहून या पुस्तकामुळे होणाऱ्या सकारत्मक बदलाचे कौतुकही केले. या पत्राबरोबरच दादासाहेब थेटे यांचे छायाचित्र असलेले आणखी आठ तिकिटे पाठवली असून, या तिकिटांचा वापर देशी तसेच आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहार करण्यासाठी करावा अशी विनंतीही करण्यात आली आहे. हरवलेली माणस या पुस्तकाला सामान्य वाचकापासून ते उच्च पदस्थ अधिकारी वर्गाकडून मिळत असलेली लोकप्रियता नक्कीच सामाजिक बदलास कारणीभूत ठरेल असा विश्वास या पत्रातून कासार यांनी व्यक्त केला आहे पोस्टाच्या तिकिटावर एका ग्रामीण भागातील नवं लेखकाचा झालेला असा सन्मान पाहून त्यांचे व हरवलेली माणसं या पुस्तकाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.