Home विदर्भ आर्णी पं.स.अंतर्गत पैसे अडवा पैसे जिरवा या एक कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी

आर्णी पं.स.अंतर्गत पैसे अडवा पैसे जिरवा या एक कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी

379

शाखा अभियंता ठेकेदाराच्या दावणीला.

देवानंद जाधव

यवतमाळ – आर्णी पंचायत समिती अंतर्गत गावा गावात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. महाळुंगी मध्ये तर भ्रष्टाचाराचा विक्रम नोंदवला आहे. काम न करता सुध्दा लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहे. सिमेंट नाला बांध.,सिमेंट नाली बांधकाम, ऊघडी गटारे, आदी कामे थातुरमातुर केली आहे. विशेष म्हणजे याची तक्रार केल्यानंतर कुशल आणि अकुशलच्या नावावर बेरीज करतांना गणकयंञाचा स्फोट होईल ईतकी रक्कम पंचायत समिती मधुन लुटली आहे. शिवाय शेततळी, नाला सरळीकरण केवळ नाममाञ करुन बोगस मोजमाप पुस्तीका तयार करुन लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहे. महाळुंगी गावच्या या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारा संदर्भात वसंतराव नाईक विकास महामंडळ मुंबई चे माजी संचालक अनिल विजयसिंह नाईक यांनी वारंवार पाठपुरावा करुन तक्रार दाखल केली. जी. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) यांनी गट विकास अधिकारी यांना २० ऑक्टोबर २०२०रोजी चौकशीचे आदेश दिले. माञ संबंधित अधिकारी आणि पंचायत समिती कर्मचारी यांनी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, याची दिशाभुल केली. भ्रष्टाचारामध्ये हात बरबटले असल्याने,कोट्यवधी रुपयांच्या पापाचे धनी मुग गिळुन बसले,.अमरावती विभागाचे रोहयो उपायुक्त यांचे पञ क्र./विआअ/रोहयो/कली/कावी/२६९\२०२०दिनांक १९|६|२०२०या चौकशी करण्याचा आणि भ्रष्टाचारा संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल पाठविण्याच्या आदेशाला गट विकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली. महाळुंगी मध्ये शौचालय बांधकामाची पुरती वाट लागली आहे. शेकडो शौचालयाचे बांधकाम न करताही पैस्याची ऊचल केल्याचे धक्का दायक प्रकार ऊघडकीस आले आहे. नमुना क्रमांक चार रजिस्टर मध्ये खोट्या सह्या, बोगस अंगठा ठसे घेऊन शासनाच्या तिजोरीला शेंडी लावली आहे. या भ्रष्टाचारामध्ये सामील लुटारुंच्या विविध बॅंकेत लाखो, करोडोच्या ठेवी आहेत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत बाजारात भजे सुध्दा ऊधार न मिळणारे ठेकेदार ईतके मालामाल झाले कसे हा संशोधनाचा विषय आहे. पंचायत समितीचे अभियंते सासुच्या जीवावर जावाई ऊधार झाले आहे. यांची कळत नकळत दिवसा ढवळ्या आरोग्य तपासणी झाल्यास त्यांचे खरे रुप जनतेसमोर होणार आहे. एकंदरीत महाळुंगी सह अवघ्या आर्णि तालुक्यात सरपंच, सचिव,रोजगार सेवक शाखा अभियंता, ठेकेदार यांनी, शासनाच्या पाणी अडवा पाणी जीरवा, या धर्तीवर ” पैसे अडवा पैसे जिरवा “हा एकमेव एककलमी कार्यक्रम राबवला जात आहे. तालुक्यातुन प्राप्त होणा-या तक्रारीची, कार्य तत्पर जिल्हाधीकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन, भ्रष्टाचा-यांना धडा शिकवावा अशी माफक अपेक्षा आर्णि तालुक्यातील गावा गावातुन व्यक्त होत आहे.