Home नांदेड माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग गायकवाड यांचे निधन – कोकलेगाव परिसरात शोकाकळा

माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग गायकवाड यांचे निधन – कोकलेगाव परिसरात शोकाकळा

102
0

राजेश एन भांगे

नांदेड – नायागांव तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील रहिवासी असलेले तथा जिल्हा परिषद सदस्य दिवंगत पांडुरंग घनश्याम गायकवाड यांचे हैद्राबाद येथे दवाखान्यात उपचार चालू असताना दि. १३ एप्रिल रोजी दुपारी १;३० च्या सुमारास दुखः द निधन झाले.
ते ६० वर्षाचे होते त्यांच्या निधनाने कोकलेगावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील कोकलेगाव नगरीचे सरपंच पदाचे कुशल नेतृत्व सांभाळून गावकर्‍याच मन त्यांनी जिंकले होते कोकलेगावची ग्रामपंचायत तोडून घेऊन स्वातंत्र्य करून घेऊन राजगडनगर ग्रामपंचायतची स्थापना केली असल्यामुळे मागासवर्गीय समाजाच व्यक्तिमत्व असलेला सक्रीय कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या परिचयत होते.

कुंटूर जिल्हा परिषद गटातुन माजी राज्यमंत्री तथा मा. खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सन २०१२ मध्ये निवडणूक लढवून जिल्हा परिषदचे सदस्य झाले होते. आणि नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक जास्त मते मिळवून त्यांनी विजय प्राप्त करून मान मिळविला होता.

माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग गायकवाड यांनी कुंटूरकर यांच्या माध्यमातून कुंटूर जि प सर्कलचा दर्जेदार विकासासाठी वरच्या पातळीतुन निधी खेचून आणून विकासाचे कामे जोरदार केले त्यांच्या निधनामुळे राजकारणातील राजकारणी काळाच्या पडद्याआड गेल्याने विविध संघटने कडून भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून त्यांच्या पश्चात दोन पत्नी, पाच मुली, तीन मुले असा मोठा परिवार आहे.

भावपूर्ण आदरांजली.