Home विदर्भ यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या निमंत्रक पदी पप्पुपाटिल भोयर यांची निवड

यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या निमंत्रक पदी पप्पुपाटिल भोयर यांची निवड

122

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी – दिनांक.10 एप्रिल यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचाय्रांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व कर्मचारी संघटना एकत्र येऊन महासंघाची स्थापना करण्यात आली. या महासंघाचे निमंत्रक म्हणून पप्पुपाटिल भोयर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . 

जिल्हा परिषद मध्ये आरोग्य , शिक्षण, महिला व बालकल्याण ,पंचायत बांधकाम, लेखा,पाणीपुरवठा,पशुसंवर्धन, लिपिक वर्गीय, चतुर्थश्रेणी कर्मचारी,वाहन चालक यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांच्या संघटना कार्यरत आहेत. या कर्मचारी संघटना आपापल्या परीने काम करीत आहेत.मात्र समस्यांची सोडवणुक पुरेशा प्रमाणात होत नाही .म्हणून अनेक समस्या प्रलंबित आहे. आपल्या रास्त मागण्या मंजूर करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेवर प्रभावशाली गट निर्माण करण्यासाठी महासंघाची निर्मिती करण्यात आलीआहे  कर्मचाऱ्यांना दैनंदिन अडचणीचा सामना करावा लागतो.जि.प.स्तरीय सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या एकाच प्रमुखाकडे असल्यामुळे जी.प. कर्मचाऱ्यांनी विविध संघटनेच्या अध्यक्ष सचिव यांनी एकत्र येऊन कालच्या सभेत यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांचा महासंघ या नावाने एक शक्तिशाली संघटनेची निर्मीती झाली.
प्रत्येक कर्मचाऱ्यांचा मागील कित्येक दिवसापासून समस्या प्रलंबित असल्यामुळे प्रचंड रोष होता. सर्व कर्मचाऱ्याचे संघटन संयुक्त एकत्रित करावे व सर्वांना न्याय मिळावा यासाठी समितीचे निमंत्रक तथा समन्वयक पप्पू पाटील भोयर , गिरीश दाभाडकर राज्याध्यक्ष लिपिक वर्गीय संघटना ,संजय गावंडे जिल्हाध्यक्ष जि प. कर्मचारी संघटना यांनी पुढाकार घेतला मान्यवरांच्या उपस्थितीत सभा आयोजित केली.या सभेला विस्तार अधिकारी (पंचायत) अध्यक्ष श्री रमेश केळकर , विस्तार अधिकारी शिक्षण संघटनेचे पप्पू पाटील भोयर, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन चे अध्यक्ष संजय गावंडे,सरचिटणीस दिलीप कुडमेथे,संतोष मिश्रा,विस्तार अधिकारी सांख्यिकी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गावंडे, मनीष वाईकर ,कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोविंद इंगोले, महाराष्ट्र राज्य जि प आरोग्य सेवक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सुनिल तलमले,विजय बुटके, लिपिक वर्गीय संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीश दाभाडकर, जिल्हाध्यक्ष प्रविण धाबडेॅ, कार्याध्यक्ष आर. आर. ठाकरे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे मानद अध्यक्ष श्री राजेंद्र खरतडे, जिल्हा सरचिटणीस श्री. लक्ष्मण नागरगोजे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेटनेचे जिल्हाध्यक्ष हिंमत म्हातारमारे, जिल्हा सरचिटणीस मंगेश गाऊत्रे, प्रसिद्धीप्रमुख सतीश काळे, महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस तेजस तिवारी, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे, सचिन बिदरकर, संतोष राठोड, गुणपाल खाडे, नितीन सहारे, प्रफुल कोवे , रवी चांडक, दीपक डूबे यांच्यासह इतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेची निर्मिती करण्यात आली. या संघटनेचे महत्वाचे धोरण #बदली प्रक्रियेमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही #पेसा मधुन पेसा बदली धोरण राबवणे ,नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना बदलीसाठी प्राधान्य देणे, #यासह बदली करण्यापूर्वी जिल्हा स्तरावर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक बैठक लावणे. #प्रलंबित खाते चौकशीचे (D.E.)चे निकाल लावणे, #सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन केस मंजूर करणे.#कोरोना कालावधीमध्ये 50 %कर्मचारी उपस्थित राहण्यास संदर्भात सकाळी आणि दुपारी लावण्यात आलेल्या ड्युटी मध्ये बदल करणे.आळीपाळीने दुसऱ्या दिवशी ड्युटी लावणे बाबत. #2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. जिल्हा स्तरावर असलेले डीसीपीएस चे खाते नंबर देणे. त्यांच्या वैयक्तिक तक्रारी सोडवणे. #जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मध्ये गैर कर्मचाऱ्यांना दिलेले सभासदत्व रद्द करणे. #”सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर “पतसंस्थेचे सभासद, किंवा संचालक पदावर नियमानुसार ठेऊ नये. यासह विविध विषयावर चर्चा झाली. जिल्हा तील सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्यांना न्याय मिळणार असल्यामुळे संपुर्ण जिल्ह्यामधुन कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं आणी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.