Home विदर्भ प्रलंबीत डेहणी उपसा सिंचन प्रकल्प पुर्णत्वास जाणार निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत मा.ना.जयंत पाटील...

प्रलंबीत डेहणी उपसा सिंचन प्रकल्प पुर्णत्वास जाणार निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत मा.ना.जयंत पाटील यांच्या बैठकीत चर्चा – खा . भावनाताई गवळी

101
0

रिसोड – यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदार संघामधील यवतमाळ व वाशीम जिल्हयातील सिंचन प्रकल्पाबाबत असलेल्या महत्वाचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मा . ना . जयंत पाटील मंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास यांच्या दालनात मा . खा . भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत दि . 08 एप्रिल 2021 रोजी बैठक संपन्न झाली , मतदार संघाच्या विकासा करीता सदोदीत कटीबद्ध असलेल्या भावनाताई हया शेतकन्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असो की शेतकन्यांच्या सिंचनाचा ते सोडविण्याकरीता त्या सतत प्रयत्नरत असतात . बैठकीमध्ये सिंचन अनुशेषग्रस्त वाशीम जिल्हयातील बॅरेजेस चे प्रश्न सोडविण्यासह कृषी व जलसंपदा विभागा अंतर्गत बन्याच वर्षापासून प्रलंबीत असलेल्या डेहणी उपसा सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असून कंत्राटदाराकडून येत्या 21 जुन पर्यंत या योजनेचे काम पुर्ण करण्याविषयी निर्णय झाला असून संबंधीत कंत्राटदाराने 21 जुन पर्यंत काम पुर्ण न केल्यास इतर कंत्राटदारांकडून काम पुर्ण करून घेण्याच्या सुचना खा , भावनाताई गवळी यांनी केल्या . यवतमाळ जिल्हयातील अत्यंत महत्वाचा असलेला निम्न पैनगंगा प्रकल्पावर या बैठकीत चर्चा झाली असून या प्रकल्पाला 19000 ( एकोणवीस हजार ) हेक्टर जमीन लागणार असून त्यापैकी 1700 हेक्टर जमिन जलसंपदा विभागने ताब्यात घेतलेली आहे . ताब्यात घेतलेल्या जमिनीपैकी 900 हेक्टर जमीन वन विभागाची असून प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने येत्या 30 एप्रिल पर्यंत निम्न पैनगंगा प्रकल्पाचा संपूर्ण अहवाल मध्यवर्ती संकल्प संघटना ( मेरी ) नाशीक यांच्याकडे जलसंपदा विभागाने सादर करून पुढील मंजूराती प्रक्रिये करीता शासनाला सादर करायचा आहे . सुरूवातीला 350 कोटी रूपये अंदाजपत्रकीय खर्च असलेल्या या प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता 10429 कोटी रूपये झाली आहे . मा . ना . जयंत पाटील , मंत्री जलसपंदा व लाभक्षेत्र विकास यांच्या दालनात संपन्न झालेल्या बैठकीला मा . ना . विजय वडेट्टीवार मंत्री मदत व पुर्नवसन , खा . भावनाताई गवळी , माजी मंत्री मा . शिवाजीराव मोघे , सचिव – लाभक्षेत्र विकास जलसंपदा , सचिव – प्रकल्प समन्वय जलसंपदा कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ , संबंधीत मुख्य अभियंता , अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते .