Home जळगाव डेडीकेट हेल्थ सेंटर( हॉस्पिटल) चे लोकार्पण

डेडीकेट हेल्थ सेंटर( हॉस्पिटल) चे लोकार्पण

178

मानियार बिरादरीचा स्तुत्य उपक्रम- कुलकर्णी

रावेर (शरीफ शेख)

जळगाव कोविड केअर युनिट व जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी च्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, एम जे कॉलेज समोर ,जळगाव येथे २५ बेड च्या डेडिकेटेड हेल्थ सेंटरच्या हॉस्पिटलचे जळगाव शहर महानगर पालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी व जळगाव शहर चे काझी अतिकउररहेमान यांच्या शुभ हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम पर्सनल ला बोर्ड चे संचालक हाजी गफ्फार मलिक होते.

यावेळी सेंटरचे मुख्य समन्वयक फारुक शेख , मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रियाज गुलाब बागवान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एजाज शेख व डॉ मोहसीन शेख सह मनपा डॉ विजय घोलप उपस्थित होते.

*शासन दरापेक्षा कमी दरात उपचार*
शासनाने ठरविलेल्या दरा पेक्षा कमी दरात या संघटनेने हॉस्पिटल सुरू केले असून ते अत्यंत आवश्यक असून याचा फायदा सर्व समाजाला होईल अशा प्रकारचे कार्ये करण्यास पुढे यावे असे वक्त्यव्य आयुक्त कुलकर्णी यांनी केले.
मुफ्ती अतिक यांनी कुराण पठण करून अशा वेळी सर्व मानावतेने एकत्रित होऊन ईश्वराला नतमस्तक होऊन यातून सुटके साठी प्रयत्न करावे व गोर गरिबांना मदत करावी असे आवाहन केले.
गफ्फार मलिक यांनी गरीब रुग्णांना मलीक फाउंडेशन तर्फे आवश्यक ती मदत करण्याचे घोषित केले

शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा सुद्धा अत्यंत कमी दरात ना नफा ना तोटा या तत्त्वावर सदरचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून याचा लाभ गरीब रुग्णांनी घ्यावा असे आव्हान हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.