Home महत्वाची बातमी बापाने आपल्या सख्ख्या मुलास मारून टाकले

बापाने आपल्या सख्ख्या मुलास मारून टाकले

31
0

गुन्हा दाखल आरोपीस अटक

अमीन शाह

अकोला , दि. १८ :- बोरगाव मंजू पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या आपोती येथे एका जन्मदात्या बापानेच आपल्या लाडक्या मुलाची अमानुष निर्घृण पणे हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी खुनी बापास अटक केली आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार आपोती येथील सचिन पळसागर 26 याने गेल्या काही दिवसांपूर्वी आपली मोटर सायकल 15 हजार रुपयात गहाण ठेवली होती ती मोटर सायकल सोडविण्या साठी सचिन याने आपल्या बापास पैसे मागितले पैसे देण्या वरून बाप बेटा यांच्यात वाद झाला या वादात बाप भीमराव पळसागर याने आपला मुलगा सचिन यास कुऱ्हाडीने जबर मारहाण केली झालेल्या या मारहाणीत मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला या प्रकरणी तंटा मुक्ती अध्यक्ष यांच्या तक्रारी वरून खुनी बापास अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .

Unlimited Reseller Hosting