Home विदर्भ राजूरवाडी येथे आदिवासी महिलांना रोजगारा बाबतच कायद्या विषयी मार्गदर्शन.!

राजूरवाडी येथे आदिवासी महिलांना रोजगारा बाबतच कायद्या विषयी मार्गदर्शन.!

19
0

सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १८ :- ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रमातील आधार बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील घाटंजी तालुक्यातील ग्राम राजूरवाडी येथे आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आदिवासी महिलांसाठी रोजगार हमी कायद्याची प्रत्यक्ष अमलबजावणी कशी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निमित्त होते हळदीकुंकू कार्यक्रमाचे .

कार्यक्रमात संस्था प्रमुख राजश्री राऊत व ग्रासरूट लीडर अर्चना तुरे यांनीं आदिवासी महिलांना आरोग्यविषयक दक्षता , स्वच्छता , महिला ग्रामसभा यावर मार्गदर्शन केले.व संस्थेच्या वतीने आदिवासी महिलांना हँडवास वितरित करण्यात आले.तसेच दिपक मरघडे विभागीय समन्वयक ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रम विभाग विदर्भ यांनीं रोजगार हमी कायदा व प्रत्यक्ष अमलबजावणीची कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले.या बाबत माहिती सांगताना दीपक मरघाडे म्हणाले की,आदिवासी महिलांनी आता शिक्षण प्रवाहात येणे महत्वाचे असून शिक्षणामुळे कायद्याने ज्ञाण मिळते त्यामुळे महिलांचे हक्क काय आहे याची जाणीव होते.संविधाना प्रमाणे महिलांना आरक्षण असून आरक्षणा प्रमाणे महिलांना राजकीय संधी प्राप्त झाली असून सरपंच ते जिल्हा परिषद सदस्याची संधी मिळाली असताना आपले अधिकार महीला जाणू शकते.
त्यामुळे महिलांना आरोग्य, शिक्षण, व कायद्याचे ज्ञान माहित होवून ग्रामसभेमध्ये सहभाग वाढवून आपल्या हक्काची जाणीव इतर महीलांना होवू शकेल. असे विचार यावेळी व्यक्त केले.