Home बुलडाणा पवित्र रमजान महिन्यातील लोडशेडिंग बंद करण्यात यावा मलकापुर पांग्रा येथील मुस्लिम बांधवांची...

पवित्र रमजान महिन्यातील लोडशेडिंग बंद करण्यात यावा मलकापुर पांग्रा येथील मुस्लिम बांधवांची मागणी

379

रमजान पवित्र महिन्यातील लोडशेडिंग बंद करण्यात यावी मलकापुर पांग्रा येथील मुस्लिम बांधवांची मागणी

 

निवेदन सादर ,

मलकापूर पांग्रा अमोल साळवे

14 /04/2019 पासून इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजान सुरू होत आहे, रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रात्री तीन ते चार वाजता सहीरी साठी उठतात व दिवसभर अन्नपाणी सेवन न करता उपवास ठेवतात ,तसेच रात्री नमाज तरावीह व कुराण पठण करत असतात . यामुळे मलकापूर पांग्रा येथील मुस्लिम बांधवांनी विद्युत अभियंत्याला निवेदन देऊन रमजान महिन्यातील लोड शेडींग बंद ठेवण्यात यावी अशी मागणी केली. लहान मुलां पासून ते ज्येष्ठांपर्यंत उपवास करत असतात परंतु उन्हाळा सुरू असल्याने वाढलेल्या भयंकर तापमानापासून उपवास धरला त्रास होईल व रात्री 3 वाजता स्वयंपाक करणे नमाज पठण करणे या कामात महिलांना त्रास होणे या सर्व बाबींचा विचार करून रमजान महिन्या 14 एप्रिल 2019 ते 15 मे 2019 पर्यंत पूर्णत लोडशेडिंग बंद करण्यात यावी.. अशी मागणी मुस्लिम बांधवांनी विद्युत अभियंता मलकापूर पांग्रा यांना निवेदन देऊन करण्यात आली .
यावेळी निवेदन देताना जलील वहीद शेख ,फजल खान मजीत पठाण, निशान खान ,शेख तालिब , राजिक पटेल ,एजाज खान, सय्यद आसिफ उपस्थित होते.