Home विदर्भ हिंगणघाट येथील दालमिल मधील तुरीची दाळ चोरणाऱ्यास अटक.

हिंगणघाट येथील दालमिल मधील तुरीची दाळ चोरणाऱ्यास अटक.

199
0

६ लाख ३५ हजार रु चा माल जप्त, डी बी पथकाची कारवाई.

ईकबाल शेख

वर्धा हिंगणघाट आजंती येथे असलेली गोविंद अॅग्रो इंडस्ट्रीज दालमिलमध्ये ठेवलेल्या तुरीच्या डाळीचे ५० किलोची पंचवीस चुंगड्या एकूण किंमत १ लाख २५ हजार रुपयांचा माल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला आहे अशा तक्रारीवरून पोलिस स्टेशन हिंगणघाटला य़ेथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल होताच हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक प्रमुख शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतच्या परिसरात सतत माहिती काढून आरोपी व चोरीस गेलेल्या मालाबाबत शोध घेतला असता फिर्यादीच्या दालमिलमध्ये काम करणारे लेबर यांची कसून चौकशी केली असता तपासात निष्पन्न झाले की फिर्यादीचे दालमिल येथून दालमिल मधील मजूर मागील काही दिवसांपासून हिंगणघाट येथील काही लोकांच्या संपर्कात येऊन दाळीची विक्री करीत आहेत याबाबत तपास केला असता दालमिल येथील मजूर आरोपी शिवनंदी हरिप्रसाद कनोजिया वय २० वर्षे राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश, रवी एकनाथ मोरे वय २६ वर्षं राहणार चंद्रपूर व त्यांच्यासोबत हिंगणघाट येथे राहणारा वाहन चालक मालक प्रज्वल अशोक पितळे वय २० वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड हिंगणघाट यांनी संगनमत करून दालमिल येथून तुरीच्या दाळीची चोरी केल्याने त्यांना अटक करून त्यांच्या पीसीआर घेण्यात आला पीसीआरमध्ये तपासात निष्पन्न झाले की त्यांनी यापूर्वीसुद्धा दोनवेळा तुरीच्या दाळीची चोरी केली आहे असे उघड झाले.

तीनही अटक आरोपी हे दालमिल येथून तुरीच्या दाळीची चोरी करून हिंगणघाट येथे राहणारा आरोपी शेर अली सय्यद वय ३४ वर्षे राहणार हिंगणघाट यास विकली आहे त्यावरून चोरीची दाड विकत घेणारा आरोपी यास गुन्ह्यात अटक करून यातील चारही आरोपीतांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण माल एकूण ३७ तुरीच्या दाळीच्या चुंगड्या व गुन्ह्यात वापरलेली झायलो वाहन क्र. एमएच ४८ ए ४६८६ व टाटा एस वाहन क्र. ए च ३२ क्यु ३६८४ असा जुनी किंमत ६ लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी प्रशांत होळकर पाेलिस अधीक्षक वर्धा, यशवंत सोळंके अप्पर पाेलिस अधीक्षक वर्धा, दिनेश कदम उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण हिंगणघाट, पी आर पाटणकर पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे शेखर डोंगरे, नीलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भालशंकर, यांनी केली.