Home मराठवाडा मुद्रेगाव शिवारात १२ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी ,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुद्रेगाव शिवारात १२ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी ,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

348
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

(मराठवाडा)

घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव शिवारातील बारा एकर ऊस जळून खाक झाला .येथे महावितरणच्या लोंबकळलेल्या विद्युततारा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला.चार शेतकऱ्यांचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे .

शेतकरी विजयमाला रामभाऊ गायकवाड शेती गट क्र 116 ,गणेश सोपान राऊत गट क्र 115 क्र116, सिद्धेश्वर आप्पासाहेब राऊत गट क्र 114 , ज्ञानेश्वर आप्पासाहेब राऊत गट क्र 114 या शेतीतुन या लाईन च्या तारा गेल्या मुळे शार्ट सरकीट मुळे उस पेटला त्यांच्या जनावरांचा चारा जळून खाक झाला शेतकऱ्यांचे शेतांमध्ये ठिबक व तुषार जळून खाक झाले. आगीने रौद्ररूप धारण केले होते.आगीची झळ लागुन जनावराची वैरण, चारा जळून खाक झाला.विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे लोंबकळलेल्या विद्युततारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने आगीचे लोळ ऊसाच्या फडात पडले आणि आग लागली असे शेतकऱ्यांनी सांगितले विजवितरण कंपनीने नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.