Home जळगाव विलास ताठे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

विलास ताठे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

366

रावेर (शरीफ शेख)

राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विलास डिगंबर ताठे (कुंभारखेडा) यांना ‘समाजभूषण पुरस्कार 2020-21’ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी दिली.
विलास ताठे हे मराठा मूक मोर्चा समन्वयक, मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, जलसमाधी आंदोलनात सहभागी होऊन समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आहेत. या कार्यामुळे त्यांची संभाजी ब्रिगेड रावेर तालुकाध्यक्ष पदीं बिनविरोध निवड झाली. याचं अल्प कालावधीत त्यांनी आपल्यातलं उत्तम संघटक कौशल्य पणाला लावून फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत लहान सहान गाव, तांडा येथील युवकांच मजबूत संघटन उभे केले.
देशात सह महाराष्ट्रात मराठा – दलित बांधव यांचें मोठमोठे मोर्चे निघत होते, सर्व महाराष्ट् राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते.
यावेळी 1 जानेवारी 2018 रोजी रावेर तालुका येथे मराठा- दलित बांधवांच्या रावेर तालुका समन्वय समितीच्या माध्यमातून केवळ रावेर तालुका, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र राज्य नव्हे तर भारतातून सर्व प्रथम मराठा- दलित बांधव याच्यांत यावेळी ऐक्य निर्माण करण्यासाठी विलास ताठे यांनी संभाजी ब्रिगेड व निळे निशाण सामाजिक संघटना रावेर यांच्या संयुक्त माध्यमातून “भीमा कोरेगाव ते संभाजी महाराज ” असा जनजागृती , खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्याख्यान आयोजित केले. मराठा-दलित मेळाव्याचे यशस्वी कार्यक्रम राबविले. आणि मराठा-दलित व्रज मुठ लाखमोलाची यांतून निर्माण झाली. रावेर मराठा समाज विवाह समिती सदस्य म्हणून ते मराठा वधू-वर परिचय सूचक मेळाव्याचे आयोजनात सक्रियपणे पुढाकार घेऊन, रावेर तालुका मराठा समाज गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ, तसेच रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी आजही सतत कार्यरत आहेत.
तसेच कोरोनाच्या महामारीत विलास ताठे यांनी आपले सामाजिक कर्तव्ये चोखंदळ पार पडली आहेत. या काळात त्यांनी जवळपास तीन हजार ,”अल्बम 30 ” आयुर्वेदिक औषधी गुणधर्म गोळ्यांचे वाटप रावेर तालुक्यात विविध खेड्यात केले. रस्त्यावर फिरणारे, पायी जाणारे परप्रांतीय नागरिक यांना ही पाव, बिस्किटे , पाणी वाटप केले. बंदोबस्तात पहारेकरी पोलीस प्रशासन कर्मचारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी वर्ग यांना आवश्यक ती सहकार्य केले. कुंभारखेडा गावात पहिले आक्सिजन सिंलिंडर उपलब्धतेसाठी जागरूकपणे यशस्वी मोहीम हाती घेतली. कुंभारखेडा ग्रामपंचायतीच्या सर्वसामान्य, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांच्या लोकसहभागातून कोरोना काळात उपआरोग्य केंद्रात आक्सिजन सिलिंडर सोय सर्व सामान्य माणसाला आधार देण्यासाठी अलौकिक कार्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
विलास ताठे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना
” समाजभूषण पुरस्कार 2020-21″ जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी सांगितले .