Home मुंबई राज्यातील आश्रमशाळेच्या (अनु. जाती) शिक्षकांना कोविड लस देण्याची मागणी

राज्यातील आश्रमशाळेच्या (अनु. जाती) शिक्षकांना कोविड लस देण्याची मागणी

307

मुंबई – भारतात करोना संक्रमणावर नियंत्रण येतंय असं वाटत असतानाच परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होत असल्याचं दिसून येतंय. देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या तब्बल ८९ हजार १२९ वर गेलीय. यामुळे आतापर्यंतच्या एकूण संक्रमितांची संख्या १ कोटी २३ लाख ९२ हजार २६० वर पोहचलीय.गेल्या सात महिन्यांमध्ये आढळलेला हा सर्वात मोठा आकडा आहे. या अगोदर २० सप्टेंबर २०२० रोजी एका दिवसात संक्रमणबाधित ९२ हजार ६०५ रुग्ण आढळले होते.

दरम्यान,एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला दहावी बोर्ड परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार असल्याचे नियोजन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे. त्यामुळे राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला मुलींकरिता असलेल्या खाजगी निवासी व अनिवासशी सर्व आश्रमशाळे च्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्याची मागणी शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जाती निवासी शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केली आहे.

दरम्यान एप्रिल महिण्यात दहावी बोर्ड परीक्षा होऊ घातल्या आहेत. सदर परीक्षा ज्या त्या शाळेत आयोजित केल्या जाणार आहेत. सदर परीक्षेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने सर्व माध्यमिक आश्रमशाळेमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस देणे अत्यंत आवश्यक असल्या कारणाने सर्व जिल्हा साहाय्यआयुक्त यांना नियोजनकामी सूचित करावे आशा आशयाचे विनंती ई – मेल राज्याचे समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांना संघटनेचे उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी केले आहे. दरम्यान परिक्षेवेळी विद्यार्थ्यांशी शिक्षकांना प्रत्यक्ष संपर्क करावा लागतो, त्यामुळे या परीक्षेत विद्यार्थी व शिक्षक व आदी कर्मचारी सुरक्षित राहतील यांची काळजी घेणे महत्वाचे आहे.