Home जळगाव निंभोरा बु. येथे मुस्लीम कब्रस्थानला जागा खरेदी करण्यासाठी खा.निधीतुन मदत मिळावी यासाठी...

निंभोरा बु. येथे मुस्लीम कब्रस्थानला जागा खरेदी करण्यासाठी खा.निधीतुन मदत मिळावी यासाठी खा.रक्षा खडसे यांना देण्यात आले निवेदन..

246
0

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील निंभोरा बु।। गावांत मुस्लीम समाज हा मोठ्या प्रमाणात असुन समाजाची संख्या भरपुर आहे. कब्रस्थानला जागा कमी पडत असल्यामुळे समाजाला दफनविधीला खुप त्रास होत आहे. पर्यायी जागा घेण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामपंचायत निंभोरा बु।। मासिक सभा २३/०२/२१. ठराव क्र.७/३. नुसार सरपंच सचिन महाले. सुचक – सौ.सायराबी युनुस खान, अनुमोदन- सौ.निनाज अकिल खाटीक. यांनी ठराव करुन मुस्लीम समाजाला कब्रस्थानला जागा उपलब्ध व्हावी, जागा खरेदी करण्यासाठी खासदार निधीतुन मदत मिळावी , जेणे करुन समाजाला होणारा दफनविधीचा त्रास वाचेल , व मुस्लीम समाजाचा प्रश्न सुटेल. म्हणुन युनुस खान व निंभोरा बु ।। ग्रामस्थांच्या वतीने खासदार रक्षाताई खडसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळेस उपस्थित मनोज सोनार, अशोक बऱ्हाटे, प्रमोद कोंडे होते. युनूस खान यांनी निवेदन देतांना जागेबाबत अडचण, व दफन विधी करतांना समाजाला होणारा त्रास खासदार रक्षाताई खडसे यांना सांगितला.