Home विदर्भ आलेगाव येथे वार्ड क्रमांक ४ मध्ये वाढले दादागिरी चिडीमारी व अवैधधंद्याचे प्रमाण

आलेगाव येथे वार्ड क्रमांक ४ मध्ये वाढले दादागिरी चिडीमारी व अवैधधंद्याचे प्रमाण

152
0

कार्यालय प्रतिनिधि

अकोला / आलेगाव – पातूर तालुक्यातील आलेगाव येथील वार्ड नंबर ४ मध्ये दादागिरी चिडीमारी व अवैधधंद्याचे प्रमाण काही वर्षा पासून वाढले असुन कोणीही या दादा व चिडीमारी सह अवैधधंदा करणाऱ्या विरोधात तक्रार करत नसून दादा लोकांचे चिडीमारांचे व अवैध धंदा करणाऱ्याचे होसले बुलंद झाले आहे , काही महिन्यांपूर्वी वार्ड क्रमांक चार येथील पोलीसवाला साप्ताहिक व पोर्टलचे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रा.मो.शोएबोद्दीन यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. या वार्डात दादा लोकांचे अतिक्रमण असल्याने येथे नेहमी वाद होता . ग्रामपंचायत चे आशीर्वादाने या वार्डात दादा लोक अतिक्रमण करतात व कोणी काही म्हटलं तर त्याला मारहाण करून खोटे केस मध्ये अटकवण्याचे धमक्या देतात व खोटी तक्रार सुद्धा करतात सोबत गोर गरिबांचे काम होऊ देत नाही गोर गरीबांना दाबतात सोबत या वार्डात चिडीमारी सह अवैध धंदे सुद्धा गुपचूप रीत्या चालू असून पोलीस खाते कुठेतरी कमी पडत आहे असे नागरिकांचे बोलणे आहे , 

सोबतच ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे या वार्डात अतिक्रमण वाढले असून आपल्या राजनेतीक पोळ्या भाजण्यासाठी हे राजकारणी अतिक्रमण गावात अनु देत नाही व सोबतच गरिबांचे मतदान घेतात पण त्यांचे कोणते ही कामा करत नाही.