Home विदर्भ सात मृत्युसह जिल्ह्यात 545 जण पॉझेटिव्ह  , 342 जण कोरोनामुक्त

सात मृत्युसह जिल्ह्यात 545 जण पॉझेटिव्ह  , 342 जण कोरोनामुक्त

194
0

 

       यवतमाळ, दि. 2 : गत 24 तासात जिल्ह्यात सात मृत्युसह 545 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 342 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 42, 75, 77 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, नेर येथील 60 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 48 वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि. 2) पॉझेटिव्ह आलेल्या 545 जणांमध्ये 374 पुरुष आणि 171 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 147 जण पॉझेटिव्ह, उमरखेड 80, दिग्रस 61, पुसद 57, आर्णि 13, कळंब 9, पांढरकवडा 43, दारव्हा 22, घाटंजी 17, वणी 16, महागाव 22, नेर 15, बाभुळगाव 23, झरीजामणी 5, मारेगाव 7, राळेगाव 7 आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे.

            शुक्रवारी एकूण 6018 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 545 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5473 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3046 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1302 तर गृह विलगीकरणात 1744 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 29776 झाली आहे. 24 तासात 342 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 26023 आहे. तर जिल्ह्यात एकूण 667 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.75 असून मृत्युदर 2.24 आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 277095 नमुने पाठविले असून यापैकी 274060 प्राप्त तर 3035 अप्राप्त आहेत. तसेच 244284 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.