Home मुंबई आरे मधील अधिकारी याच्या मुळे पत्रकाराच्या जीवितास धोका व खोटे गुन्हे नोंद...

आरे मधील अधिकारी याच्या मुळे पत्रकाराच्या जीवितास धोका व खोटे गुन्हे नोंद करण्याचे षडयंत्र…!

290
0

अनधिकृत बांधकामची तक्रार केली म्हणून पत्रकार सिद्धार्थ काळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी.

मुख्य कार्यकारी अधिकारी आरे

मुंबई  , प्रतिनिधी – दिनांक ०१/०४/२०२१ रोजी पत्रकार सिद्धार्थ काळे यांना आरे मधील युनिट क्रमांक ३२ मधील अनधिकृत बांधकामाची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर सिद्धार्थ काळे यांनी आरे कॉलनी येथील सहाय्यक सुरक्षा अधिकारी विजय वाघ यांना भेटून अनधिकृत बांधकामांची तक्रार देण्यासाठी आरे कार्यालय येथे गेले असतात ज्या ठेकेदार माहीला विरोधात तक्रार होती त्या अगोदरच सहाय्यक सुरक्षा अधिकारी विजय वाघ याच्या सोबत कार्यालयात बसलेल्या होत्या ३० मिनिट वाट बघून सिद्धार्थ काळे ठेथून निघून गेले,त्या नंतर सिद्धार्थ काळे यांनी सहाय्यक सुरक्षा अधिकारी विजय वाघ व मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांना त्याच्या व्हाससॲप क्रमांक सदर अनधिकृत बांधकामांची तक्रार केली त्या नंतर तीन ते चार तासानंतर सिद्धार्थ काळे यांना एका व्यक्तींनी फोनवरून संपर्क साधला आणि म्हणाला तु जी तक्रार केली आहे ती तक्रार का केली आहे.

मला का विचारलं नाही तू माझ्या विभाग मध्ये येऊन काम करतोस मला का विचारलं नाही. त्या महिलेला तु वलोखतोस का तेव्हा सिद्धार्थ काळे यांनी सांगितले की मला सदर अनधिकृत बांधकामांची माहिती मिळाली म्हणून मी त्या माहितीच्या आधारावर मी सदर तक्रार केली आहे व त्या महिलेला मी वळखत देखील नाही. तेव्हा सदर व्यक्तींनी त्यांना सांगितले की तुझ्या विरोधात ती महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.आता तुम्ही हे झेलेत बसा म्हणजे एकूण परिस्थितीअशी की सिद्धार्थ काळे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकानीचे शेड्यंत्र सदर अनधिकृत बांधकाम निर्माण करणारी महिला वानखेडे व त्याचे सहकारी आणि आरे तील अधिकारी यांच्या संगनमताने होत आहे.या मुळे एखाद्या कार्यालय मध्ये जर पत्रकाराला अश्या धमक्या दिल्या जात असेल तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा असा प्रश्र्न निर्माण झाली आहे.या विषयमध्ये लवकरच पत्रकार संरक्षण समिती महारष्ट्र चे मुंबई प्रदेश अध्यक्ष व महासचिव सिध्दार्थ काळे व त्यांचे शिष्टमंडळ पोलीस उप आयुक्त परिमंडळ 12 चे स्वामी साहेब यांना भेटून या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.आणि गोपनीय माहिती च्या नुसार ज्या लोकांनी अनधिकृत बांधकाम निर्माण कार्य करत आहेत,ते पुढील प्रमाणे आहेत,मंसुरी हे पंचशील चाळ डबल मळ्याचे काम करत आहे, गायकवाड डबल माळा साई कृपा चाळ,आगडे गणेश मित्र मंडळ इत्यादी लोक अनधिकृत बांधकाम निर्माण कार्य करत आहेत.लवकरच संबधित व्यक्ती व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मा.मुख्यमंत्री,नगरविकास मंत्री,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री,मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य,दुग्ध व्यवसाय विकास विभाग आयुक्त इत्यादी सभांधित विभाला रीतसर तक्रार ईमेल द्वारे केली आहे.आता सदर अनधिकृत बांधकाम निर्माण कार्य करणाऱ्या ठेकेदार यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकारी यांच्यावर काय कारवाई होईल त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.