Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्याचा प्रभारी पालकमंत्री पद मला द्या – जुनेद शेख

यवतमाळ जिल्ह्याचा प्रभारी पालकमंत्री पद मला द्या – जुनेद शेख

147
0

यवतमाळ जिल्हा हा गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदा पासून वंचित असून आज मी सोशल मीडिया द्वारे मी एक इलेट्रॉनिक मीडिया चा संपादक सह पत्रकार म्हणून मी यवतमाळ जिल्हया चा पालकमंत्री पद मागत आहे..

गेल्या काही दिवसांपूर्वी या जिल्ह्याचे आणि दिग्रस विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण मध्ये चांगल्याच वादात अडकले विरोधी पक्ष भाजपने टाकलेल्या जाळ आणि टीका या दोन्ही या मध्ये अटकून अखेर त्यांना या पदभार चा राजीनामा मुख्यमंत्री कडे द्यावा लागला नंतर नाट्यसम्राट पुन्हा वाढल्याने मुख्यमंत्री यांनि थेट राज्यपाल कडे राजीनामा सोपवला आणि संजय राठोड यांचा वनमंत्री पद हातून सटकला.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण मध्ये चौकशी लागली. परंतु आता सध्या च्या घडीला जिल्हा हा बेवारस सारखा झाला असून मी जुनेद शेख बोरी अरब तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ मी ज्या गावात राहतो ते गाव जिल्ह्याच्या मध्यबिंदू असून म्हणून जिल्ह्याचे सर्व प्रकारे कामा चा निपटारा करू शकतो…
मला प्रभारी पालकमंत्री पद देऊन माझ्या वरती विश्वास ठेवून कामाची गती बघा…