Home जळगाव गौरखेडा सब स्टेशन परिसरात शॉर्टसर्किटने आग, मोठा अनर्थ टळला.

गौरखेडा सब स्टेशन परिसरात शॉर्टसर्किटने आग, मोठा अनर्थ टळला.

276

सावखेडा ता रावेर- येथून जवळच असलेल्या गौरखेडा येथील सब स्टेशन परिसरात अचानक ट्रिपिंग मुळे दिनांक ३० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व नुकसान झाले नाही.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ३० रोजी कुंभारखेडा कक्षांतर्गत गौरखेडा सब स्टेशन वर अचानक तारांमध्ये ट्रीपिंग झाल्याने शॉर्टसर्किट होऊन अचानक सब स्टेशन परिसरात कोरडे गवत असल्याने आग लागली. त्यावेळेस सब स्टेशन येथे सिनिअर ऑपरेटर आर आर चौधरी हे ड्युटीवर हजर होते. सब टेशन वर त्रिपिंग होऊन शॉर्टसर्किट ने आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी व गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील यांनी वीज कर्मचारी गुरुदास पाटील, राजू भिलाला, नारायण तायडे यांना फोन करून बोलावले ,तरी गौरखेडा गावातील ग्रामस्थ मंडळी ही लगेच आग विझविण्यासाठी आले. या सर्वांच्या सहकार्याने लवकरच आग विझवून आटोक्यात आणली. आग गौरखेडा गावात न पसरता मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी व नुकसान झाले नाही. परंतु या ठिकाणी आग विझवण्यासाठी फायर गॅस सिलिंडर हे एकच उपलब्ध असल्याने या ठिकाणी आग विझवण्यासाठी वीज कर्मचारी व ग्रामस्थ यांना खूप अडचणीना सामोरे जावे लागले. एकच फायर गॅस सिलेंडर आग विझवण्यासाठी पुरेशी नसून गौरखेडा सब स्टेशनला आग विजवण्यासाठी लागणारे फायर गॅस सिलेंडर हे कमीत कमी चार ते पाच उपलब्ध करण्यात यावे, जेणेकरून सब स्टेशन वर जर मोठी आग लागली तर आग विझवण्यासाठी ते उपयोगी येईल.
प्रतिक्रिया-
विशाल नेमाडे
कनिष्ठ अभियंता कुंभारखेडा कक्ष
गौरखेडा फिडरवर दिनांक ३० रोजी दुपारी अचानक ट्रीपिंग झाल्याने स्पार्किंग होऊन तिथे परिसरात कोरडे गवत असल्याने अचानक आग लागली. त्यात वीज कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यात आली. गौरखेडा सबस्टेशनला एकच फायर सिलेंडर उपलब्ध असल्याने ते आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. परंतु याठिकाणी मोठी आग लागली तर किमान चार ते पाच सिलेंडर शासनाने उपलब्ध करून द्यावे जेणेकरून मोठा अनर्थ टळू शकेल.