Home विदर्भ काम करीत असताना सिडेटच्या कामगाराच्या हातात घुसला राॅड

काम करीत असताना सिडेटच्या कामगाराच्या हातात घुसला राॅड

344
0

कंपनीकडुन माहिती देण्यास टाळाटाळ.

ईकबाल शेख

वर्धा जिल्हा आष्टि तालुका तळेगाव (शा.पं.) :  संरक्षण दलाला स्फोटके पुरविण्याचे काम करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं ६ वर असलेल्या तळेगाव येथील सिडेट कंपनीत शनिवारी दुपारी कंपनीत काम करीत असतांनीच एका कामगाराच्या तळहातात स्टिलचा राॅड घुसला त्यामुळे कामगार जखमी झाला त्याला आर्वी येथील खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले असुन त्याचेवर त्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सिडेट कंपनीतील व्यवस्थापकाला फोन करुन माहिती विचारली असता त्यांनी झालेल्या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ केली. सदर कंपनी मध्ये स्पोटके तयार होत असुन अशाप्रकारच्या घटना वारंवार होत असतात परंतु झालेल्या घटनेची कंपनीतील कोणत्याहि कामगाराने कंपनी बाहेर वाच्यता न करण्याची तंबी कंपनी कडुन देण्यात आली असुन कोणीहि कंपनीत घडलेल्या अपघाताची माहिती कंपनीबाहेर सांगितल्यास कामावरुन काढुन टाकण्यात येईल असी तंबी कंपनी प्रशासनाकडुन कामगारांना दिली असल्याने कामावरुन काढुन टाकण्याच्या धाकापाई गरीब कामगार बिचारे झालेल्या घटनेची कोणताही कामगार गावात वाच्यता करीत नाही. तेव्हा कंपनीत अपघात झाल्यास आर्वी येथील एका सुप्रसिद्ध खाजगी हास्पीटलमध्ये नेवुन उपचार केल्या जातो हा नेहमीचाच प्रकार असुन त्या ख्याती प्राप्त खाजगी हास्पिटलमधील डाॅक्टरांना या कंपनीतील अपघाताबाबत माहिती विचारली असता तेहि माहिती देत नाहि यावरुन सदर डाॅक्टर व कंपनी प्रशासनाची मिलिभगत असल्याचे निस्पन्न होते. गरीब कामगार बिचारे पोटाकरीता बुक्क्यांचा मार सोसत काम करीत असुन कंपनीत काहि झाल्यास कुठेहि वाच्यता करीत नाहि.